छत्तीसगड : २७ नक्षलवादी ठार, चार जिल्ह्यांत नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाई सुरू

नारायणपूर : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अबुझहमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. दंतेवाडा, नारायणपूर, विजापूर आणि कोंडागाव जिल्ह्यांच्या सीमेवर जंगलात चकमक सुरू आहे. आतापर्यंत २७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. अनेक नक्षलवादी जखमी झाले आहेत.


सुरक्षा पथकांकडून यावेळी जिल्हा राखीव रक्षक हे नक्षलवाद्यांविरुद्धच्या चकमकीत आघाडीवर आहेत. दोन्ही बाजूंकडून अधूनमधून गोळीबार सुरू आहे. अनेक नक्षलवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरक्षा पथकांना नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाईसाठी मार्गदर्शन करत आहेत. छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या ताज्या कारवाईत नक्षलवादी रुपेश आणि आणखी काही नक्षलवाद्यांचे नेते यांना सुरक्षा पथकांनी घेरले आहे.


नक्षलवाद्यांच्या सामर्थ्याचा बीमोड करण्यासाठी व्यापक कारवाई सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा पथकांकडील एक जवान जखमी झाला आणि एक जण हुतात्मा झाला.

Comments
Add Comment

Share Market Update : जागतिक बाजारांकडून सकारात्मक संकेत; आशियाई बाजारही तेजीत

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील शांतता चर्चा पुन्हा मार्गी लागल्याच्या बातमीने बाजारातील वातावरण सुधारत असल्याचे

Gujrat Car Video : गुजरातच्या पठ्ठ्याचा भन्नाट जुगाड; चक्क कारलाच बनवलं '1BHK' घर, एकदा हा व्हिडिओ पाहाच

अहमदाबाद : सध्या देशभरात कार मॉडिफिकेशनचं वारं वाहत असलं तरी गुजरातच्या एका पठ्ठ्याने मात्र कल्पकतेच्या सर्व

Sikkim Landslide : भूस्खलनात अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी भारतीय लष्कराचे युद्धपातळीवर प्रयत्न

- भारतीय लष्कराकडून 'ऑपरेशन हिम सेतू'ला सुरुवात भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने उत्तर सिक्कीममधील लाचेन

Gangster Atiq Ahmed : प्रयागराज हादरलं! गँगस्टर अतीक अहमदच्या ड्रायव्हरची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आज म्हणजेच गुरुवार ९ एप्रिल रोजी अतीक अहमदचा (Gangster Atiq Ahmed) ड्रायव्हर, मोहम्मद इरफान,

Parth Pawar Rajya Sabha MP Oath : गुलाबी जॅकेट अन् डोळ्यांवर चष्मा...हुबेहूब अजित दादा! पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड आज देशाच्या राजधानीत पाहायला मिळाली. दिवंगत अजित

Trending News : कमळाच्या देठातून श्वास घेत 5 तास लपला; सराईत चोरटा अखेर सापडला

लखनऊ : उत्तर प्रदेशातील एका चोरट्याला पकडण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) राबवलेली कारवाई अत्यंत थरारक ठरली.