अमृत भारत स्थानकांमध्ये उत्तर प्रदेशचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा प्रतिबिंबित

गोरखपूर: भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत असून या अंतर्गत व्यावसायिक आणि नागरिक- केंद्रित सेवांना प्रोत्साहन दिले जाईल. देशभरात अशी १ हजार ३०० हून अधिक रेल्वे स्थानके बांधली जात आहेत. या योजनेअंतर्गत, रेल्वे स्थानके ही शहर केंद्रे म्हणून विकसित केली जात आहेत.

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत, १०३ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला असून, उत्तर प्रदेशातील १९ स्थानके असून त्यात बलरामपूर, सिद्धार्थनगर, स्वामी नारायण छापिया, मैलानी, गोला, गोकर्णनाथ, रामघाट हॉल्ट, इज्जतनगर, बरेली सिटी, उजनी, हाथरस सिटी, सुरेमानपूर, बिजनौर, सहारनपूर, फतेहाबाद, गोवर्धन, इदगाह आग्रा जंक्शन, पोखरायण, गोविंदपुरी यांचा पुनर्विकास करण्यात आला. १९० कोटींहून अधिक खर्चाने ही विकसित स्थानके स्थानिक संस्कृती आणि उत्कृष्ट प्रवासी सुविधांचे मिश्रण आहेत. या स्थानकांमध्ये भव्यता असून यांची प्रवेशद्वार, आकर्षक दर्शनी भाग, उंच दिवे, आधुनिक प्रतीक्षालय, तिकीट काउंटर, आधुनिक शौचालय आणि दिव्यांगजनांसाठी सुलभ रॅम्पसारख्या सुविधा विकसित केल्या आहेत.

सिद्धार्थनगर स्टेशनवर बौद्ध संस्कृतीची झलक दिसते, जिथून देश-विदेशातील लोक भेट देऊ शकतात. सरयू नदीच्या अयोध्या काठावर असलेल्या रामघाट हॉल्ट स्टेशनवर प्रवाशांसाठी १,१६४ चौरस मीटरची एक नवीन बहुउद्देशीय इमारत केली आहे. छपिया स्टेशनला स्वामी नारायण मंदिर म्हणूनही ओळखले जाते. सहारनपूर स्टेशन हे शाकंभरी देवी मंदिर म्हणून ओळखले जाते त्याप्रमाणे अनुकूल डिझाइन केले गेले आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत, उत्तर प्रदेश आता त्या दिशेने वाटचाल करत असून जिथे प्रत्येक स्टेशन स्थानिक संस्कृती, आधुनिक वास्तुकला आणि आणि चांगल्या प्रवासी सुविधांचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरणार आहे.
Comments
Add Comment

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले