Himant Biswa : आसाममधून ७३ पाकिस्तानी एजंटना अटक!

  65

ऑपरेशन आसामद्वारे पाकिस्तानला दणका


पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या १२ गद्दारांना बेड्या ठोकल्यानंतरही गुप्तचर खातं शांत बसलेलं नाहीय. कोणत्या ना कोणत्या राज्यात पाकिस्तानी एजंट कार्यरत आहेत. धक्कादायक म्हणजे एकट्या आसाममध्ये ७३ पाकिस्तान एजंटांवर कारवाई करण्यात आलीय. आसाममध्ये नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या लेखातून...



घरभेदी आणि ट्रॅव्हल्स यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तिच्या कारनाम्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या तपास यंत्रणांनी वेगाने चक्रं फिरवायला सुरुवात केली. त्यानंतर अनेक राज्यांतील पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे एजंट्स जाळ्यात अडकले. अशीच मोठी कारवाई आसाममध्ये करण्यात आलीय. आसाममध्ये दहा - बारा नव्हे तर चक्क ७३ पाकिस्तानी एजंट्सना पकडण्यात आलंय. बरं, या कारवाईची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी एक्स पोस्टद्वारे दिलीय. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांचं कंबरडं मोडावं, यासाठी आसाममध्ये ऑपरेशन सिंदूरप्रमाणेच दहशतवादीविरोधी मिशन सुरू करण्यात आलंय. या मिशनचाच एक भाग म्हणून घरभेदींना पकडणं आणि त्यांना शिक्षा करणं सुरू आहे. या मिशननुसार आसामच्या चिरांग आणि होईज या जिल्ह्यातून प्रत्येकी एका पाकिस्तानी एजंटला पकडण्यात आलं. आणि त्यानंतर ७३ पाकिस्तानी एजंट्सवर कारवाई करण्यात आली.



पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आसाममध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले गेले. या घटनेची दखल मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची धमकी दिली. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी सर्व घरभेद्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत मिशन सुरूच ठेवण्याचा निर्धार केलाय. याआधी विरोधी पक्षनेता AIUDFचा आमदार अमीनुल इस्लामला अटक करण्यात आली.


पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तान आणि त्यातील कटातल्या सहभागाबद्दल देशद्रोहाच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करून त्याचा बदला घेतला. या कारवाईनंतर भारत गप्प बसलेला नाही. ज्योती मल्होत्रासारख्या अनेक घरभेद्यांना शोधून त्यांच्यावर कडक करण्याचा विडाच उचललाय. भारतातच राहून भारताविरोधात देशद्रोह करणाऱ्यांचा बीमोड करण्यासाठी तपास यंत्रणांनी कंबर कसलीय. आणि आता हीच वेळ आहे ती म्हणजे घरभेद्यांनाही ठेचण्याची.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या