सीबीएसईने 'शुगर बोर्ड' का स्थापन केलं?

  67

तुमच्या घरातली मूलं शाळेत जाऊन सतत चॉकलेट, चिप्स, थम्सअप, पिझ्झा खातात का? तर ही माहिती खास तुमच्यासाठी महत्त्वाची आहे!


गेल्या काही वर्षांत, शालेय मुलांमध्ये टाईप-२ डायबेटीस म्हणजेच मधुमेहाचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय. पूर्वी चाळीशीनंतर दिसणारा हा आजार, आता लहान वयातच मुलांना बळी पाडतोय. यामागचं मुख्य कारण आहे अति साखर आणि प्रोसेस्ड फूडचं वाढतं सेवन. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSEने एक मोठा निर्णय घेतलाय. ते त्यांच्या सर्व शाळांमध्ये ‘शुगर बोर्ड’ स्थापन करत आहेत.


पूर्वी टाइप-2 मधुमेह हा आजार प्रामुख्याने प्रौढांमध्ये दिसून येत होता. परंतु, आता मुलं देखील त्याचे बळी ठरताहेत. अतिसाखर सेवन आणि बदललेली जीवनशैली याला कारणीभूत ठरत असल्याचं समोर आलंय. जास्त गोड खाल्ल्यानं केवळ मधुमेह नव्हे तर लठ्ठपणा, दंत समस्या आणि इतर विकार देखील वाढतात. ज्याचा मुलांच्या दीर्घकालीन आरोग्यावर आणि शैक्षणिक कामगिरीवर विपरित परिणाम होतो. त्यामुळं सीबीएसईने त्यांच्या सर्व शाळांना 'शुगर बोर्ड' स्थापन करण्यास सांगितलंय.



एक अभ्यास सांगतो की, ४ ते १० वर्षांतील मुलांमध्ये १३% कॅलरीज साखरेतून मिळतात, तर ११ ते १८ वर्षांतील मुलांमध्ये १५% कॅलरीज साखरेतून मिळतात. प्रत्यक्षात मुलांच्या दररोजच्या सेवनात कॅलरीजचे हे प्रमाण फक्त ५% असावे. मात्र शालेय विद्यार्थ्यांच्या सेवनात कॅलरीजचे प्रमाण अधिक आढळलं आहे. यामुळे केवळ मधुमेह नाही, तर लठ्ठपणा, दातांची झीज, आणि मानसिक थकव्यासारखे अनेक त्रास वाढू शकतात.



आता स्थापन केलेले शुगर बोर्ड काय करणार?


तर शाळांमध्ये चर्चासत्रे आणि कार्यशाळा घेऊन साखरेच्या दुष्परिणामांबद्दल मुलांना माहिती देण्यात येईल. साखरयुक्त पदार्थांपासून दूर राहण्याचं प्रोत्साहन दिलं जाईल, पालक, शिक्षक आणि मुलांमध्ये जनजागृती करण्यात येईल. यामुळे आता तरी सावध व्हा – तुमच्या मुलांचं ताट काय सांगतंय, याकडे लक्ष द्या!

Comments
Add Comment

'शिंदेंना लॉटरी लागली, मुख्यमंत्री झाले, पण टिकवता आली... मंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा वाद हा काही राज्याला नवा नाही. मंत्री गणेश नाईक

पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षेची कमान तृतीयपंथीयांच्या हाती

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या सुरक्षेची जबाबदारी काही तृतीयपंथीयांवर देण्यात आलेली आहे. सुरुवातीच्या

पोलीस अधिकाऱ्याची आंदोलकाला फिल्मी स्टाईल लाथ का मारली? पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं

गेल्या दोन दिवसापासून जालन्यातील हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पोलीस उपाधिक्षक अनंत कुलकर्णी असं या अधिकाऱ्यांचे

कोकणात पुढील 4 दिवस विजांसह मुसळधार पावसाचा इशारा

राज्यभरात सध्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून कोकणात पुढील ४ दिवस विजांसह मुसळधार पावसाचा इशारा

Pune Accident News : ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’चा कहर, मद्यधुंद चालकाने ठोकली चक्क डीसीपींची गाडी

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे आणि त्यातून होणारे अपघात (Pune Accident News) या घटनांत

मुंबईत सगळीकडे पाणीच पाणी, किंग्ज सर्कल, अंधेरी, दादर तुंबलं, पोलिसांचा अलर्ट

मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाळा सुरुवात झाली असून मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलं आहे. एकीकडे मुंबईसह