लोणंद रेल्वे स्थानकाचा कायापालट

२४ डब्यांची गाड्या उभ्या राहण्यासाठी २ प्लॅटफॉर्म सज्ज


पुणे : अमृत भारत योजनेअंतर्गत लोणंद रेल्वे स्टेशनचा विकास करण्यात येत आहे. या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन येत्या २२ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या निमित्ताने पत्रकारांचा पाहणी दौऱ्याचा आयोजन करण्यात आले होते. लोणंद रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी केंद्र सरकारने आत्तापर्यंत दहा कोटी ४८ लाख रुपये पहिल्या टप्प्यासाठी मंजूर केले आहेत. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने येथील सर्व कामे पूर्ण केले असून, आता या रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे.

नव्या लोणंद रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक सुविधा, सर्क्युलेटिंग एरिया, पार्किंग एरिया, नवीन लाईनची कामे पूर्ण, सुसज्ज रस्ते, प्रतीक्षालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, २४ डब्यांची गाड्या उभ्या राहण्यासाठी दोन प्लॅटफॉर्म सज्ज, लवकरच आणखी दोन प्लॅटफॉर्म आणि एक गुडस स्टोरेज रूम तयार होणार, प्रवाशांना माहिती मिळावी यासाठी दोन नवीन डिजिटल बोर्ड, सीईजी कन्सल्टन्सी मार्फत रेल्वे स्थानकाचा विकास, दिवसभरात पाचशे प्रवासी करतात ये-जा, तीन एक्सप्रेस गाड्यांना थांबे, यात कोयना, महाराष्ट्र आणि सह्याद्री एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश, स्थानकाला पर्यावरण पूरक रंगरंगोटी, प्रवाशांना बसण्यासाठी नवीन आसन व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान यांच्या अमृत भारत योजनेअंतर्गत लोणंद स्थानकाचा विकास केला जात आहे. तब्बल १०.४७ कोटी गुंतवणुकीतून हा विकास करण्यात आला आहे. यात नवीन स्टेशन प्रवेशद्वार, आधुनिक बुकिंग ऑफिस आणि कॉन्कोर्स, नवीन प्रवेश/निर्गमन दरवाजे आणि कंपाऊंड वॉल यांचा समावेश आहे. कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म बांधण्यात आला आहे. सर्क्युलेटिंग एरिया, पार्किंग झोन करण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक १ मध्ये आता एक नवीन प्रतीक्षालय तयार केले आहे.

 
Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या