आसाममध्ये पाकिस्तानी समर्थकांविरुद्ध मोठी कारवाई, आतापर्यंत ७३ एजंटना अटक

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ला आणि पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केल्यानंतर भारतात सातत्याने गुप्तहेर पकडले जात आहेत. केवळ आसाममध्ये आतापर्यंत ७३ पाकिस्तानी एजंट्सना पकडण्यात आले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी ही माहिती दिली.


एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले की चिरांग आणि होजई जिल्ह्यातून एका-एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरप्रमाणेच राष्ट्र विरोधींना पकडणे आणि त्यांना दंड करण्याचे आमचे मिशन सुरू आहे. ७३ पाकिस्तानी एजंटना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.


याआधी विपक्षी एआययूडीएफचे आमदार अमीनुल इस्लामला पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तान आणि त्यातील कटात सहभागाबद्दल देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली होती.  याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर एनएसएकडून ताब्यात घेण्यात आले. पोलीस चौकशी सुरू आहे.


आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी २ मेला दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान झिंदाबाद अशी घोषणा देणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची धमकी दिली होती. तसेच देशद्रोहींविरुद्ध ही कारवाई सुरूच राहील असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व