मुंबई विद्यापीठात नावीन्यपूर्ण पदव्युत्तर अभ्यासक्रम

मुंबई : मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमांची येत्या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने चारही विद्याशाखांमध्ये गुणवत्ता आणि संशोधनावर आधारित अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे.


विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), विदा विश्लेषण (डेटा अॅनालिटिक्स), सायबर सुरक्षा, क्लाऊड कम्प्युटिंगसह विविध नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु केले आहेत. तसेच मंदिर व्यवस्थापनाचाही पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.



मुंबई विद्यापीठातर्फे उद्योग, संशोधन आणि सामाजिक गरजा लक्षात घेऊनही विविध अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत.


जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा, उपकरणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य अशा वैविध्यपूर्ण वातावरणात उच्च शिक्षणाच्या विविध संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी सक्षम व्हायला मदत होणार आहे.


सर्व अभ्यासक्रमांची पात्रता, प्रवेश प्रक्रिया आणि इतर तपशीलवार माहिती मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून प्रवेशसाठी विद्यार्थ्यांनी https://mu.ac.in/admission या संकेतस्थळावर जाऊन ३ जूनपूर्वी नोंदणी करावी असे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री