विलंबाने तिकीट घेतल्यास प्रवाशावर कारवाई

  36

'पीएमपी' प्रशासनाचा निर्णय



पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमधून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच विलंबाने तिकीट घेणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी मोबाइल ॲप ऑनलाइन तिकीट प्रणाली विकसित केली आहे. या ऑनलाइन ॲपला तांत्रिक अडचण आल्यास किंवा सुट्ट्या पैशांवरून वाद टाळण्यासाठी अत्याधुनिक ई-मशीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांनी बस थांब्यावरून बसमध्ये बसतानाच तिकीट काढून प्रवास करावा, असे आवाहन ‘पीएमपी’ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ‘जीवनवाहिनी’ असलेल्या पीएमपीला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद असतानाही २०२४-२५ या आर्थिक वर्षात संचलन तूट ७६६ कोटींपर्यंत पोहोचली आहे. त्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी मार्गांचा विस्तार, नवीन मार्गांवर बसचे संचलन, तसेच ऑनलाइन तिकिटासाठी ऑनलाइन ई-मशीन, ॲप आणि इतर सेवांमधील त्रुटी दूर करून नवीन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.



प्रवाशांनी बसलेल्या बसथांब्यावरून त्वरित तिकीट घेणे अनिवार्य करण्यात आले असून, ऑनलाइन तिकीट घेताना नेटवर्कमुळे तिकीट वितरित होण्यास विलंब होत असल्यास वाहकाकडून ई-मशिनद्वारे रोखीने तिकीट घ्यावे. जे प्रवासी तिकीट वेळेत घेणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या

‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’

बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर ३६ मीटर उंच पुलाची उभारणी

अभियांत्रिकी क्षेत्रात पूल ठरणार चमत्कार अहमदाबाद : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे.

तुळजाभवानी मातेची तलवार गहाळ! स्थानिक पुजाऱ्यांनी दिली माहिती

तुळजापूर:  तुळजाभवानी मंदिरातील खजिना खोलीतून शस्त्र पूजनासाठी वापरली जाणारी विशेष तलवार गहाळ झाली आहे, असे

रेव्ह पार्टी करणाऱ्या पतीसाठी कायपण! रोहिणी खडसेंची प्रांजल खेवलकरला वाचवण्यासाठी धडपड

पुणे: पुण्यातील उच्चभ्रू सोसायटी रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी मारलेल्या छापेमारीत एकनाथ खडसे यांचे जावई

Pune Accident: पुण्यात खड्ड्याने घेतला वृद्धाचा जीव, यंत्रणेचा निष्काळजीपणा की हेल्मेटचा अभाव?

पुणे:  पुण्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यामुळे एका ६१ वर्षीय वृद्ध नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ते