आजपासून अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: संपूर्ण राज्यात आजपासून अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे.राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. १९ ते २८ मे दरम्यान विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येणार आहे. शिक्षण विभागाने https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर केंद्रीकृत प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.


विद्यार्थ्यांना अर्जासाठी १०० रुपये शुल्क भरावे लागेल. याआधी ऑफलाइन अर्जासाठी हजारो रुपये मोजावे लागत होते. आता एकाच पोर्टलवरून १० कॉलेजसाठी अर्ज, डाक्युमेंट अपलोड, गुणवत्तानुसार गुणवत्ता यादी, आणि प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक मिळणार आहे.


प्रवेश प्रक्रिया पारदर्शक व संगणकीकृत असून कोणताही गैरव्यवहार होणार नाही. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विभागीय कक्ष व हेल्पलाइन (८५३०९५५५६४) आणि support@mahafyjcadmissions.in या ईमेलवर मार्गदर्शन उपलब्ध आहे.



प्रथम प्राधान्य क्रमांकाच्या महाविद्यालयात प्रवेश बंधनकारक


विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेशासाठी किमान १ आणि जास्तीत जास्त १० प्राधान्यक्रम भरावे लागतील. जर पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात गुणांनुसार जागा मिळाली, तर तिथे प्रवेश घेणे बंधनकारक आहे. जर प्रवेश घेतला नाही, तर अशा विद्यार्थ्यांना पुढच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत सहभागी होता येणार नाही. त्यांना फक्त 'सर्वांसाठी खुली फेरी' या शेवटच्या फेरीतच संधी मिळेल.

Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.