नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ऑगस्ट महिन्यात सुरू होणार

  189






नवी मुंबई : बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आता ऑगस्ट २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे. उद्घाटनाच्या तारखेची अधिकृत घोषणा पावसाळी अधिवेशन काळात होण्याची शक्यता आहे.






आधीच्या नियोजनानुसार विमानतळाचे उद्घाटन १५ मे २०२५ पर्यंत होणार होते. पण विमानांच्या सुरक्षित वाहतुकीत काही अडथळे अद्याप आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी आणखी कालावधी लागणार असल्यामुळे विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर टाकण्यात आले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नोटीस टू एअरमन अर्थात नोटॅम जारी करुन किमान ६ ऑगस्ट २०२५ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टेक-ऑफ, लँडिंग, आपत्कालीन वापरासाठी अनुपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे.

विमानांच्या सुरक्षित वाहतुकीत ८६ निवासी इमारती, जवळच्या टेकड्यांवरील ७९ उंच बांधकामं, विजेच्या उच्च दाबाच्या तारांसाठी उभारलेले २३ खांब, १२ मोबाईल टॉवर, स्टेडियमचे आठ फ्लड लाईट, चार विजेचे खांब, तीन ओद्योगिक धुरांडी, औद्योगिक कामांसाठी उंचावर कार्यरत असलेल्या तीन क्रेन यांचा अडथळा आहे. हे अडथळे दूर करण्यासाठी आणखी कालावधी लागणार असल्यामुळे विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर टाकण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात सोमवार ३० जून २०२५ पासून होणार आहे. याआधी ३ मार्च २०२५ ते २७ मार्च २०२५ दरम्यान सुटीचे दिवस वगळून सोळा दिवस विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले. या अधिवेशनात १० मार्च २०२५ रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प दोन्ही सभागृहांनी मंजूर केला. लक्षवेधी सूचनांची विक्रमी संख्या हे मार्च २०२५ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होते. या अधिवेशनानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दिमाखात उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेणार: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

दत्तात्रय भरणेंनी हाती घेतला कृषीमंत्री पदाचा पदभार मुंबई: शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी

Gold Silver Rate: पाचव्यांदा सोन्यात गगनचुंबी व पाच दिवसांनी चांदीत रॉकेट वाढ ! ही आहेत 'कारणे'

मोहित सोमण:  सोन्यात आज 'गगनचुंबी' वाढ झाली आहे. जागतिक व्यापार अस्थिरतेचा फटका चौथ्या दिवशीही सोन्यात कायम

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: ट्रम्प यांच्या धमकीमुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांची बरबादी कायम 'हे' आहे आजचे सविस्तर विश्लेषण

मोहित सोमण: आज अखेर इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सकाळच्या सत्रातील घसरण ट्रम्प यांच्या टेरिफ

वसईत डॉक्टरच्या ऑटोमॅटीक ईव्ही कारचा थरकाप उडवणारा अपघात

वसई : वसई येथील सन सिटी परिसरात एका डॉक्टरचा आणि त्याच्या पत्नीचा भयानक अपघात झाला. मिथिलेश मिश्रा असं या