पार्किंगची सोय नसेल, तर गाडीही नको! राज्यात लवकरच पार्किंग पॉलिसी लागू होणार!

  150

मुंबई : राज्यात खाजगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना, पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने आता महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याचे ठरवले असून, लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात नवी पार्किंग पॉलिसी लागू केली जाणार आहे. ही माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.


राज्यातील एमएमआर (मुंबई महानगर प्रदेश) परिसरात पार्किंगसाठी जागांचा तुटवडा गंभीर असून, या भागात प्रथम ही पॉलिसी राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. "आम्ही अशी भूमिका घेतली आहे की, ज्याच्याकडे पार्किंगची निश्चित जागा असेल, त्यालाच वाहन नोंदणी (रजिस्ट्रेशन) करता येईल," असं सरनाईक यांनी स्पष्ट केलं.



ते पुढे म्हणाले, “अनेक देशांमध्ये पार्किंग पॉलिसी सक्तीची आहे, परंतु आपल्या देशात ती अद्याप अस्तित्वात नाही. त्यामुळे या पॉलिसीची सुरुवात एमएमआरपासून करून, पुढे ती संपूर्ण राज्यात लागू केली जाणार आहे.”


या बैठकीत परिवहन विभागातील अंतर्गत बदल्यांवरही चर्चा झाली. सरनाईक म्हणाले, “बदल्या मी ऑनलाईन बटन दाबून केल्या आहेत. यामध्ये प्रेग्नंट महिलांबाबत आम्ही संवेदनशील आहोत. त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल.”


तसेच, एमएमआर भागात पॉड टॅक्सी प्रकल्पासाठीही विभाग आग्रही आहे. या प्रकल्पासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हिरवा कंदील मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.

Comments
Add Comment

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत