मुंबई इंडियन्सची टीम प्ले ऑफसाठी कशी पात्र ठरणार ?

मुंबई : आयपीएल २०२५ मध्ये ७० साखळी सामने होणार आहेत. यापैकी साठ सामने झाले आहेत. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे तीन संघ आयपीएलच्या पुढील फेरीसाठी पात्र ठरले आहेत. पुढील फेरीसाठी चौथा संघ म्हणून पात्र होण्याकरिता दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात चुरस आहे.

मुंबई इंडियन्सचे अजून दोन साखळी सामने व्हायचे आहेत. यापैकी एक सामना २१ मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आणि दुसरा सामना २६ मे रोजी जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर होणार आहे. मुंबईला दिल्ली आणि पंजाब या दोन संघांविरुद्ध प्रत्येकी एक साखळी सामना खेळायचा आहे. हे दोन्ही सामने जिंकले तर मुंबई इंडियन्सची टीम आरामात पुढील फेरीसाठी चौथा संघ म्हणून पात्र होणार आहे. पण यातील एखादा सामना मुंबईने गमावल्यास जर - तरच्या गणिताला सुरुवात होणार आहे.

तिन्ही सामने जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी लखनऊ संघाला आशा करावी लागेल की दिल्ली आणि मुंबई 16 किंवा त्याहून अधिक गुणांपर्यंत पोहोचणार नाहीत. दिल्लीचा मुंबईने पराभव केला तर दिल्ली स्पर्धेतून बाहेर पडेल. जर दिल्ली जिंकली तर मुंबईला पंजाबविरुद्धचा शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल आणि दिल्लीने त्यांचा शेवटचा लीग सामना पंजाबविरुद्ध गमवावा अशी आशा करावी लागेल.

गुजरात टायटन्सने २२ मे रोजी लखनऊ आणि २५ मे रोजी चेन्नईविरुद्धचे उर्वरित दोन सामने जिंकल्यास ते टॉप टू मध्ये कायम राहतील आणि २९ मे रोजी होणाऱ्या पहिल्या क्वालिफायरमध्ये खेळतील. जर गुजरातने एक सामना गमावला तसेच पंजाब किंवा आरसीबीने त्यांच्या उर्वरित साखळी सामन्यांपैकी एक सामना गमावला, तरीही गुजरात अव्वल दोनमध्ये राहील. पण इतर संघांचे निकालही गुजरातच्या टॉप टू मध्ये असण्यावर परिणाम करतील.
Comments
Add Comment

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून