अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना प्रोस्टेट कॅन्सर, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

वॉशिंगटन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कॅन्सरने ग्रासलं आहे. बायडन यांना प्रोस्टेट ग्रंथींचा कॅन्सर झाल्यानं त्यांची प्रकृती ढासाळत चालली आहे. (Former US President Joe Biden has prostate cancer) रविवारी (दि.१७) बायडन यांच्या कार्यलयाकडून याबाबत माहिती देण्यात आली.


बायडन यांच्या कार्यालयानं सांगितलं की, प्रोस्टेट कर्करोग त्यांच्या हाडांपर्यंत पसरला आहे. यामुळे त्यांच्यावर कॅन्सरची ट्रिटमेंट सुरु केली जाणार आहे. बायडन यांना लागण झालेला विकार  हा काहीसा आक्रमक स्वरुपाचा  आहे. पण कॅन्सरचे हार्मोन्स संवेदनशील असल्याने ते नियंत्रित होऊ शकतात.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे ८२ वर्षांचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना लघवीचा त्रास होता. यासाठी शुक्रवारी बायडन यांची जेव्हा डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली, तेव्हा त्यांना प्रोस्टेट कर्करोग झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली. प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाल्यानंतर, जो बायडेन आणि त्यांचे कुटुंब डॉक्टरांशी उपचार पर्यायांवर चर्चा करत आहेत. बायडेन यांना झालेला हा आजार अधिक आक्रमक आहे. त्यामुळे त्यावर वेळीच योग्य उपचार होणे आवश्यक आहे.जो बायडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्या आजारपणाच्या वृत्ताने समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.

जो बायडन यांच्या मुलाचा कर्करोगाने मृत्यू


२०१५ साली बायडेन यांचा मोठा मुलगा ब्यू बायडेन याचा कर्करोगानेच मृत्यू झाला होता. त्याला ग्लायोब्लास्टोमा नावाच्या मेंदूच्या अत्यंत धोकादायक कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर आता जो बायडन यांना प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. बायडेन कुटुंबीय पुढील उपचारासाठी कर्करोग तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.



बायडेन यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली प्रार्थना


बायडन यांना कॅन्सरची लागण झाल्याची बातमी कळताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, मेलानिया आणि जो बायडन यांच्या नुकत्याच समोर आलेल्या वैद्यकीय स्थितीबद्दल ऐकून दुःख वाटलं. जिल कुटुंबांसोबत (बायडन यांची पत्नी) आमच्या सद्भावना आहेत. आम्ही बायडन यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी आशा करतो.जो बायडेन हे ८२ वर्षांचे असून २०२१ ते २०२४ या कालावधीत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.



जो बायडन यांच्या प्रकृतीबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली काळजी


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील बायडेन यांच्या आजाराबद्दल ट्विट करत काळजी व्यक्त केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी  ट्विट करत म्हणाले की, "जो बायडेन यांच्या प्रकृतीबद्दल ऐकून खूप काळजी वाटली. त्यांनी लवकर आणि पूर्ण बरे व्हावे माझ्या सदिच्छा. या संघर्षाच्या काळात आम्ही सर्वजण डॉ. जिल बायडेन आणि त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत,"

 

राष्ट्राध्यक्षपदाच्या शेवटच्या कार्यकाळात त्यांच्यावर सातत्याने वय आणि प्रकृती यावरून विरोधक टीका करत होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तीन महिन्यापूर्वी त्यांनी माघार घेतली आणि त्यांच्याजागी कमला हॅरिस यांचा उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, अमेरिकेच्या जनतेने बायडेन यांना नाकारले आणि ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले.

Comments
Add Comment

सोनिया गांधी रुग्णालयात

नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल

Hydrabad Crime : अमेरिकेत हैदराबादच्या लेकीची निर्घृण हत्या; संशयित माजी रूममेट भारतात पळाला, तामिळनाडूत अटक

हैदराबाद : अमेरिकेतील मेरीलँड राज्यात डेटा आणि स्ट्रॅटेजी ॲनालिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या निकिता गोडिशला (वय

चोरीसाठी शिरला, पण नशीब फिरलं! दोन दिवस भिंतीत अडकलेला चोर, VIDEO व्हायरल

चोरीसाठी चोर कोणत्या थराला जाऊ शकतो, याचा काही अंदाज नाही. मात्र राजस्थानमध्ये चोरा सोबत असं काही घडलं की त्याला

लाल किल्ल्याजवळील स्फोटप्रकरणात एनआयएचा तपास वेगात; नऊ आरोपी अटकेत

नवी दिल्ली : लाल किल्ला स्फोट प्रकरणातील आरोपी यासिर अहमद दार याची कोठडी १६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पहिले स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’ तटरक्षक दलाच्या ताफ्यात

जहाज आधुनिक अग्निशमन क्षमतांनी सुसज्ज; कोचीत राहणार तैनात पणजी : जहाजबांधणी आणि सागरी क्षमता विकासात

उमर खालिदला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : दिल्लीत २०२०च्या दंगलींशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निर्णय