मोहोपाडा सेबी वळणावर पुलानजीक भगदाडाने अपघाताची भीती

अलिबाग : मोहोपाडा ते दांडफाटा या मार्गावरील सेबी वळणावरील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाजवळ खालील बाजूस चेंबरला भला मोठा भगदाड पडल्याने तेथे मोठ्या अपघातांची भीती व्यक्त होत आहे. दांडफाट्याकडे, तसेच एनआयएसएम सेबीकडे येजा करणाऱ्या रस्त्यावरून वाहनांची सतत रेलचेल सुरू असते. अशा वेळी वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या भल्या मोठ्या भगदाडमुळे तेथे अपघात होऊन वाहन चालक जखमी किंवा त्यांची जीवितहानी होण्याचा धोका आहे. याची दखल महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रसायनी पाताळगंगा मराविमने घेऊन संबंधित कंत्राटदाराला सेबी रस्त्याजवळ असलेल्या पुलालगत असलेल्या भगदाडाची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Comments
Add Comment

पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचा दणदणीत विजय - शेकाप महाविकास आघाडीचा सपशेल पराभव

पनवेल :  पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

महाडमध्ये ५ गट आिण १० गणांसाठी २०३ मतदान केंद्र

१६ ते २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत महाड वार्तापत्र संजय भुवड महाड : तालुक्यात ५ जिल्हा

नवी मुंबई विमानतळाने ओलांडला १ लाख प्रवाशांचा टप्पा

विमान उड्डाणांच्या संख्येत लक्षणीय वाढ नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमआयए) एका

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने