Pakistani Spy: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी ज्योती मल्होत्रानंतर हरियाणातून आणखीन एकाला अटक, अनेक धक्कादायक माहितीचा खुलासा

हरियाणाच्या नूहमध्ये पाकिस्तानी 'गुप्तचर' नेटवर्कचा पर्दाफाश, दोन दिवसांत दुसरी अटक


चंदीगड: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात हरियाणातील हिसारमधून युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक केल्यानंतर, पोलिसांनी केलेल्या कारवाईत आणखी काही लोकांच देखील चौकशी केली जात आहे. ज्यामध्ये हरियाणाच्या नूह जिल्ह्यातून दोन संशयित हेरांना अटक केली आहे. त्यामध्ये मोहम्मद तारिफ या नावाचा मुख्य  गुप्तहेर असून, त्याने पाकिस्तानच्या गुप्तचर नेटवर्कसाठी काम केल्याची कबुली दिली आहे.


तारिफ, नूह जिल्ह्यातील तावाडू येथील कांगारका गावचा रहिवासी असून, सुरुवातीला पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना सिम कार्ड पुरवण्याचे काम करत होता. पुढे त्याच अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, त्याने भारतीय लष्करी ठिकाणांबाबत संवेदनशील माहिती पुरवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानला पाठवली, आणि नंतर ती तंत्रज्ञान वापरून डिलीटही केली गेली.


तारिफच्या जबाबानुसार, त्याचा पहिला संपर्क पाकिस्तानच्या दिल्लीतील दूतावासातील अधिकारी आसिफ बलोचशी झाला होता. बलोचच्या माध्यमातून त्याने पाकिस्तानातही प्रवास केला. परत आल्यावर त्याला अशा लोकांना पाकिस्तानात पाठवण्याची जबाबदारी देण्यात आली, ज्यांना पाकिस्तानी व्हिसाची गरज होती. यासाठी त्याला पैसे देखील दिले जात होते. २०२४ मध्ये आसिफ बलोचची बदली झाल्यानंतर तारिफचा संपर्क दुसरा पाकिस्तानी अधिकारी जाफरशी झाला. जाफरने तारिफला सिरसा येथील हवाई दल तळावर नजर ठेवण्याचे आणि तिथली गोपनीय माहिती मिळवण्याचे काम दिले. गेल्या दीड वर्षांपासून तारिफने मोठ्या प्रमाणात माहिती पाकिस्तानला पाठवली असल्याचे पोलीस तपासांत स्पष्ट झाले आहे.


तारिफचा विवाह दिल्लीतील चंदनहोला येथे झाला होता आणि त्याला दोन मुलं देखील आहेत. या परिसरात तो एक ढोंगी डॉक्टर म्हणूनही ओळखला जात होता. अंसल फार्म हाऊसजवळ त्याने एक छोटंसं क्लिनिक उघडलं होतं, ज्याचा वापर केवळ सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी केला जात होता. आता हरियाणा पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी सुरू केली असून, पाकिस्तानशी संबंधित हेरगिरीच्या नेटवर्कचा तपास वाढवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या