kamal haasan : ७० वर्षीय दिग्गज अभिनेत्याचा २८ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत ‘लिप लॉक’

आगामी चित्रपटातील बोल्ड सीन सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ!


मुंबई : काही दिवसांपासून चेन्नई मधल्या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘ठग लाइफ’. काही दिवसांपूर्वी चेन्नईमध्ये या सिनेमाचा ग्रँड म्युझिक लाँच सोहळा पार पडला होता. आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. कमल हसन यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे.


दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील बहुप्रतीक्षित ‘ठग लाइफ’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ७० वर्षीय कमल हसन पुन्हा एकदा त्यांच्या अ‍ॅक्शन अवतारात मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. दोन मिनिटांचा हा ट्रेलर अत्यंत उत्कंठावर्धक असून, एका सीनमध्ये खलनायक झालेल्या महेश मांजरेकर यांची झलक पाहायला मिळते.या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांना प्रचंड आवडला. दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये कमल हसन यांनी त्यांच्या अ‍ॅक्शनने आणि प्रत्येक दृश्याने लोकांना थक्क केले. पण सध्या सर्वांत जास्त लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे कमल हसन यांचा रोमँटिक सीन आणि तोही दोन नायिकांसह.



त्रिशा-अभिरामीबरोबर कमल हसन यांचा रोमान्स


‘ठग लाइफ’ हा चित्रपट मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केला आहे आणि त्यात कमल हसन यांच्याबरोबर त्रिशा कृष्णन व अभिरामी मुख्य भूमिकांत आहेत. ट्रेलरमध्ये कमल हसन यांचा अभिरामीबरोबर एक किसिंग सीन आहे आणि त्रिशाबरोबर एक रोमँटिक सीन आहे. त्रिशा ४२ वर्षांची आहे व अभिरामी ४१ वर्षांची आहे. अशा परिस्थितीत कमल हसन यांचा त्यांच्यापेक्षा २८ वर्षांनी लहान असलेल्या नायिकेबरोबरचा रोमँटिक सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


मणिरत्नम दिग्दर्शित या गँगस्टर ॲक्शन ड्रामामध्ये कमल हसन, सिलांबरसन, त्रिशा कृष्णन, सान्या मल्होत्रा, अभिरामी, अशोक सेल्वन, ऐश्वर्या लक्ष्मी, जोजू जॉर्ज, नस्सर, अली फजल, पंकज त्रिपाठी, रोहित सराफ व वैयापुरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


१९८७ च्या ‘नायकन’ या प्रतिष्ठित चित्रपटानंतर मणिरत्नम आणि कमल हसन यांना या चित्रपटाने पुन्हा एकत्र आणले आहे. सिलांबरसन खलनायकाची भूमिका साकारत आहेत. ट्रेलरमधील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. कमल हसन स्टारर अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट ५ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं