महापालिकेच्या परिवहन बसला भीषण अपघात

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन बसला भीषण अपघात झाला. या अपघातात चालकाच्या प्रसंगावधनामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे मोठे नुकसान झाले आहे.


मीरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेची भाईंदर रेल्वे स्थानक ते चौक बस मार्ग क्रमांक १ ही बस भाईंदर वरून चौककडे गेली. रोजच्या प्रमाणे बस प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली होती. चौक येथून उतरणीवर बस असताना अचानक ब्रेक नादुरुस्त होऊन लागत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. बस चालकाने प्रसंगवधान साधून मोठ्या कौशल्याने वेग कमी करत बसवर ताबा घेत बस थांबवली; परंतु ती डिव्हायडरवर आदळली गेली. अन्यथा ती उलटण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठा अनर्थ घडला असता. सुदैवाने अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. अपघातामुळे पुन्हा एकदा परिवहन सेवेच्या नादुरुस्त बसचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ फलकावरून वाद

नामकरणावरून राजकारण : गेल्या अनेक वर्षांपासून या विमानतळाच्या नामकरणावरून राजकारण सुरू आहे. दि. बा. पाटील

सर्पदंश झालेल्या मावशीचाही उपचारादरम्यान मृत्यू!

मृतांच्या नातेवाइकांचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन कल्याण (वार्ताहर) : साडेचार वर्षांच्या

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘डीजीसीए’कडून परवाना

उद्योजक गौतम अदानी यांच्याकडून पाहणी नवी मुंबई : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला (एनएमआयए) नागरी विमान

नवी मुंबईसह सर्व महापालिकांवर महायुतीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार

नवी मुंबई : नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेली घरे आपण नियमित करण्याचा निर्णय घेतला. सिडकोच्या घरांच्या किमती कमी

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव!

केंद्राला प्रस्ताव पाठविल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Central Railway : मध्य रेल्वेचा 'मास्टरप्लॅन'! सीवूड्स-उरण मार्गावर २० नव्या लोकल धावणार, ऑक्टोबरपासून प्रवास होणार सुपरफास्ट

नवी मुंबई : सिवूड्स दारावे-बेलापूर-उरण या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी एक अत्यंत