मुंबईच्या नालासोपारामध्ये ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त, ५.६० कोटींचा मुद्देमाल जप्त

मुंबई : मुंबईच्या नालासोपारातील प्रगतिनगर परिसरातून तुळींज पोलिसांनी मेफेड्रोन ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. कारखाना चालविणाऱ्या नायजेरियन महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून पोलिसांनी ५ कोटी ६० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे नालासोपाऱ्यात ड्रग्ज विक्रीच नाही तर मोठ्या प्रमाणात ड्रग तयारही होत असल्याचे समोर आले. एका इमारतीमध्ये घरात हा कारखाना सापडल्याने पोलिसांनी कारवाई केली.


मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेकडील प्रगतिनगर परिसरातील अंशित प्लाझा या इमारतीच्या रूम नं. ४०५ येथे पोलिसांनी छापा टाकला असता पोलिसांना घरात ड्रग्जचा कारखाना सुरू असल्याचे आढळले. यावेळी आरोपी नायजेरियन महिला रिटा कुरेबेवाई (वय २६) हिला पोलिसांनी अटक केली.


तिच्या घरातून मेफेड्रोन ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, ड्रग्ज बनवण्याचे साहित्य असा एकूण ५ कोटी ६० लाख ४० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिस पथकाने ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त केला. याप्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपी महिलेकडे भारतात वास्तव्य करण्यासाठी आवश्यक असलेला व्हिसा आढळलेला नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिस आयुक्तालयामधील नालासोपारा परिसरात नायजेरियन नागरिकांची संख्या मोठी आहे.

Comments
Add Comment

इमारतीवरून वीट कोसळून तरुणीचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : जोगेश्वरी पूर्वेत मजासवाडी परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास कामासाठी जात असलेल्या २२ वर्षीय

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत उबाठा चुकीचा गैरसमज पसरवतंय - राहुल शेवाळे

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीकांत यांच्या खंडपीठाने १२ नोव्हेंबरची तारीख ही निकालासाठी दिलेली

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगवान पोर्शे कार डिव्हायडरला धडकली, ड्रायव्हर गंभीर जखमी

मुंबई: मुंबईत बुधवारी रात्रीच्या सुमारास कारचा गंभीर अपघात घडला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगाने जाणारी

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम