रशियाचा युक्रेनमधील बसवर ड्रोन हल्ला, ९ ठार, ७ जखमी

मॉस्को : ईशान्य युक्रेनच्या सुमी प्रदेशात एका बसवर झालेल्या रशियाच्या ड्रोन हल्ल्यात ९ प्रवासी ठार झाले. तर सात जण जखमी झाले, असे युक्रेनियन अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. तीन वर्षांत पहिल्यांदाच एकीकडे रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये शांततेसाठी थेट चर्चा झाल्यानंतर दुसरीकडे काही तासांतच हा हल्ला झाला.


टेलिग्राम मेसेजिंग ॲपवर शेअर केलेल्या एका निवेदनात सुमी प्रादेशिक प्रशासनाने म्हटले आहे की, "हा रशियाने केलेला आणखी एक युद्ध गुन्हा आहे. प्रवासी वाहतुकीवर जाणूनबुजून केलेला हा हल्ला होता. ज्यामुळे कोणताही धोका नव्हता.''दोन्ही देशांच्या नेत्यांनी संभाव्य द्विपक्षीय बैठक, युद्धविराम आणि कैद्यांच्या अदलाबदलीवर चर्चा केली. ही चर्चा निष्फळ ठरली.


यानंतर काही तासांतच रशियाकडून हवाई हल्ला झाला. सुमी प्रदेशातील बिलोपिलिया शहरात शनिवारी सकाळी ड्रोन हल्ल्याची घटना घडली, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. सुमी लष्करी प्रशासनाचे प्रमुख ओलेह ह्रिहोरोव्ह यांनी याबाबत सांगितले की, बसवरील हल्ल्यात ७ जण जखमी झाले. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.

Comments
Add Comment

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच

गाझातील सत्ता न सोडल्यास हमासची धुळधाण करू

डोनाल्ट ट्रम्प यांची ताकीद वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या

इस्त्रायलचा गाझावर हल्ला, ६ ठार

गाझा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीत शांतता नांदावी म्हणून गाझा पीस प्लॅनची घोषणा

सुदानमध्ये ७७ लाख लोक करतायत उपासमारीचा सामना, लाखो मुलांना कुपोषणाचा धोका

सुदान (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात गरीब देश दक्षिण सुदान सध्या भयंकर संकटाचा सामना करत आहेत. तेथे आलेल्या