कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या महिलेला अटक

नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील तुळींज पोलीस ठाण्याने मोठी कारवाई केली. पोलिसांनी नालासोपारा पूर्वेतील प्रगती नगर येथील एका निवासी इमारतीमधील अमली पदार्थांवर प्रक्रिया करणाऱ्या बेकायदा कारखान्यावर धाड टाकली. या कारवाईत रीटा फती कुरेबेवेई नावाच्या नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली. पोलिसांनी एमडी अर्थात मेफेड्रोन नावाच्या अमली पदार्थाचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या एमडीची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत पाच कोटी साठ लाख चाळीस हजार १५० रुपये एवढी आहे.

खबऱ्यांनी दिलेल्या माहितीआधारे पोलिसांनी अंशित प्लाझातील एका सदनिकेवर (फ्लॅट) धाड टाकून कारवाई केली. सदनिकेत एमडीवर प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक यंत्रणा सज्ज होती. पोलिसांनी एमडीचा साठा तसेच एमडीवर प्रक्रिया करण्याची यंत्रणा या दोन्हीची जप्ती केली आणि महिलेला अटक केली. अटक केलेल्या महिलेविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई सुरू आहे. पोलीस याच प्रकरणात हेन्रीउचेन्ना उवाक्वेचाही शोध घेत आहे.

रीटा फती कुरेबेवेईकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेली वैध कागदपत्रेच नव्हती. यामुळे रीटा फती कुरेबेवेईविरुद्ध भारतात घुसखोरी करुन बेकायदा कृत्य केल्याचा आणखी एक आरोप ठेवण्यात आला आहे. ही कारवाई केल्यानंतर संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यात परदेशातून आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या कागदपत्रांची बारकाईने छाननी करण्याचे निर्देश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
Comments
Add Comment

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध