Nagpur Women Crossed LoC: नागपूरची महिला एलओसी ओलांडून गेली पाकिस्तानात

नागपूर: भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात, नागपूरमधील एक महिला नियंत्रण रेषा (LOC) ओलांडून पाकिस्तानात गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या घटनेमुळे भारतीय सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांना धक्काच बसला आहे.  सुनीता जामगडे (वय 43) असे या महिलेचे नाव असून ती नागपूरच्या संत कबीरनगर परिसरात राहणारी आहे.


हाती आलेल्या माहितीनुसार सुनीता जामगडे दिनांक 14 मे रोजी आपल्या 12 वर्षीय मुलासह काश्मीरला गेली होती. त्यानंतर ती कारगील सीमेवरील शेवटचे गाव असलेल्या हुंदरमान येथे पोहचली. या ठिकाणी आपल्या मुलाला सोडून निघून गेली. त्यानंतर स्थानिकांनी त्यांच्या मुलाला पोलिसांकडे सोपवले. सुनीता सध्या बेपत्ता असून तिला पाकिस्तानच्या सैन्याने ताब्यात घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



पाकिस्तानी धर्मगुरुसाठी उचलले पाऊल


भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून याला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानात काही स्थानिक नागरिकांनी तिला पाहिलं आणि त्यानंतर तिला अटक करण्यात आली. सुनीताची पाकिस्तानातील एका धर्मगुरूसोबत ऑनलाइन ओळख झाली होती. सुनीता त्याला भेटण्याचा प्रयत्न करत होती. यापूर्वी तिने अमृतसरच्या अटारी बॉर्डरवरून 2 वेळा पाकिस्तानमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता, पण भारतीय सुरक्षा यंत्रणांनी तिला रोखून परत पाठवले होते. मात्र, यावेळी ती थेट कारगिलमधून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेली.



सुनीताची मानसिक स्थिती स्थिर नसल्याची कुटुंबांनी दिली माहिती


सुनीताची मानसिक स्थिती पूर्णपणे स्थिर नसल्याचेही समोर आले आहे. यापूर्वी ती नागपूरच्या शासकीय मनोरुग्णालयात उपचार घेत होती. काही काळ ती एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती. २०२० मध्ये घटस्फोट झाल्यानंतर सुनीता आपल्या आपल्या मुलासोबत वेगळी राहत होती.

Comments
Add Comment

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम