वाडा पंचायत समितीचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर

  41

लाच घेताना पंचायत समितीच्या तांत्रिक सहाय्यकास पकडले रंगेहाथ


वाडा : वाडा पंचायत समिती वाडा पंचायत समितीचे तांत्रिक सहाय्यक सुशील कटारे याला विहीरीसाठी ५ लाखांचा निधी मंजूर करण्यासाठी ५ हजारांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली. या प्रकाराने पंचायत समितीचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे.


यातील तक्रारदार यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरीकरिता ५ लाखांचा निधी मंजूर करणेकरिता पंचायत समिती वाडा यांच्याकडे अर्ज केला होता. ही विहीर मंजूर करण्यासाठी तांत्रिक सहाय्यक व वरिष्ठांसाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली त्याआनुषंगाने (दि १५ मे रोजी) तक्रारदार यांना त्यांचे तक्रारी प्रमाणे पंचासमक्ष पडताळणी करिता पाठवले असता स्वत:साठी ५ हजार रुपये व वरिष्ठासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली; परंतु तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपये असल्याचे लोकसेवक कटारे यांना तक्रारदार यांनी सांगितल्याने सदरची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर ५ हजार रुपयांची लाच कटारे यांना स्वीकारल्याने त्याना रंगेहाथ पकडून अटक केली. कटारे यांच्याकडून मोबाइल घेण्यात आला असून पुढील निरीक्षण करून तपास करण्यात येत आहे. ही कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक अभिजित पवार, पोलीस हवालदार सुमडा, योगेश धारणे याच्या पथकाने केली.


दरम्यान, वाडा पंचायत समितीत टक्केवारी घेतल्याशिवाय कामच होत नाही. अनेक फाईली वरिष्ठाच्या टेबलावर महिनोंमहिने पडून असून पैशाशिवाय कामच होत नसल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैभव शिंदे हे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरले असून महिनोमहिने फाईल का पडून आहेत याची खातरजमा केल्यास हे सर्व उघड होईल.

Comments
Add Comment

पालघर नगर परिषदेचे पैसे ‘पाण्यात’!

२० गावांकडे ७ कोटी थकले पालघर : पालघर नगर परिषदेसह जवळच्या वीस गावांनी गेल्या पंधरा वर्षापासून एकाच योजनेतून

कंत्राटदारांपुढे महापालिका हतबल!

पुन्हा उघडल्या ठोक रकमेच्या निविदा विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची सर्व कामे यापुढे

खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

पालघर : खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बोईसर मधील

जिल्ह्यात पेरणीची कामे अंतिम टप्प्यात

सहा हजार हेक्टरवर भातपेरणी, जिल्ह्यात ८९ हजार हेक्टरवर होणार भाताची लागवड अलिबाग  : पावसाळ्याला यंदा मे

आणीबाणी काळ म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाई !

पालघर: संपूर्ण देशात लोकशाही मजबूत होत असताना २५ जून १९७५ रोजी संविधानाची हत्या करून आणीबाणी लागू केली. या

सूर्या प्रकल्पातून वाढीव पाणी मिळणार नाही

पालघरसह २० गावांना शोधावा लागणार दुसरा पर्याय गणेश पाटील पालघर : पालघर नगर परिषद क्षेत्रासह नजीकच्या २० गावांना