Virat and Anushka : विराट-अनुष्का व्यतिरिक्त हे सेलिब्रिटी पण प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात

  42

मथुरा : प्रेमानंद महाराजांचे देशभरात अनेक भक्त आहेत. यामध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आहेच. अनेकदा हे आपण पाहतो की, अनुष्का शर्मा आणि विराट हे प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या आश्रमाला भेट देतअसतात. कसोटी सामन्यातून निवृत्ती घेतल्यानंतर देखील विराट आणि अनुष्का प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी वृंदावनात गेले होते. त्यांचे फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीसह अनेक सेलिब्रिटी महाराजांचे भक्त


अनुष्का शर्मा आणि विराट कोहली व्यतिरिक्त, इतर अनेक स्टार्सही प्रेमानंद महाराजांचे भक्त असून दर्शनासाठी जातात. यामध्ये अभिनेता आशुतोष राणाही प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी गेले होते. ‘छावा’ चित्रपटाच्या यशानंतर या अभिनेत्याने त्यांच्या आश्रमाला भेट दिली होती. या अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात तो महाराजांशी बोलताना दिसला.


हेमा मालिनी ते द ग्रेट खलीनेही घेतलं आहे महाराजांचे दर्शन


ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी देखील वृंदावन येथील आश्रमाला भेट देतात.नुकतीच त्यांनीही महाराजांचे आशीर्वाद घ्यायला त्यांच्या आश्रमाला भेट दिली. त्यांनी प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले. अभिनेते आणि नेते रवी किशन यांनीही प्रेमानंद महाराजांची भेट घेतली होती. त्यांनी देखील त्यांचे मार्गदर्शन घेतले होते. त्यानंतर कुस्तीगीर द ग्रेट खली वृंदावनात येऊन गेले आहेत. यावेळी त्यांनी प्रेमानंद महाराजांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या समस्या महाराजांसोबत शेअरही केल्या आणि खाजगी संभाषणांमध्ये भाग घेतला.
Comments
Add Comment

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अलिबागमध्ये चित्रीकरणाला सुरुवात

अलिबाग: दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा नवा चित्रपट 'क्रांतिज्योती

Bigg Boss 19 मध्ये आंतरराष्ट्रीय तडका, माईक टायसन आणि द अंडरटेकरची एन्ट्री होणार?

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो "बिग बॉस" चा

संत विचारांनी भारावलेली कथा ‘फकिरीयत’

‘फकिरीयत’ या आगामी हिंदी चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य

‘जागरण गोंधळ’ या गाण्याला गणेश चंदनशिवे यांचा आवाज

अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी ‘आरपार’ या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर

‘जेलर २’मध्ये रजनीकांत - मिथुन यांची जोडी पुन्हा झळकणार

साउथचा सुपरस्टार आणि चाहत्यांच्या मते ‘भगवान’ असलेले रजनीकांत सध्या त्यांच्या ‘कुली’ या चित्रपटामुळे प्रचंड

‘घरत गणपती’ २९ ऑगस्टपासून चित्रपटगृहात झळकणार

का ही कलाकृती या कायम पाहाव्या अशाच वाटतात. काही चित्रपटही असे असतात की जे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. अशा