Nandgoan : नांदगावच्या पोखरी जवळ भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू; सहा गंभीर जखमी

  95

नांदगाव : नांदगाव तालुक्यातील पोखरी शिवारात एका खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इर्टीगा कार व मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात होऊन यात निफाड तालुक्यातील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले. जखमींवर नांदगाव मध्ये प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलवण्यात आले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून येणाऱ्या काळ्या रंगाची इर्टीगा कार क्रमांक (MH ०२ E E २३०९) ही गाडी येत असताना नांदगाव कडून कासारी कडे जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पो क्रमांक (MH ४१ A U ५३१६) ला जोरदार धडक दिली. या टेम्पोमध्ये सिमेंटच्या गोण्या भरलेल्या होत्या. या अपघातात इर्टीगा कारचा चालक वैभव वाल्मीक वैताळ (रा. निफाड) यांच्यासह अजून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळीच तीन जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींवर प्रथोमापचार करून पुढील उपचारासाठी तातडीने मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.



या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३३/२०२५ नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०६(१), २८१, १२५(A), १२५०(B), तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष बहाकर करत आहे.

Comments
Add Comment

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा

Prajwal Revanna : मोठी बातमी, माजी पंतप्रधानांच्या नातूला बलात्कार प्रकरणात जन्मठेप!

बेंगळुरू :  माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि माजी JD(S) खासदार प्रज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार

Kulgam Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी ठार, आठवड्याभरात दुसरी चकमक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या