कोकण रेल्वेकडून पावसाळी वेळापत्रकाची तयारी

रत्नागिरी : कोकण मार्गावर दरवर्षी १० जूनपासून पावसाळी वेळापत्रक लागू होते. यंदा ते पाच दिवस उशिराने लागू होणार आहे. या कालावधीत रेल्वेगाड्यांची वेगमर्यादा कमी करण्यात येणार आहे. तसेच सहा एक्स्प्रेस गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये कपातही करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने पावसाळी वेळापत्रकानुसार धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची वेळ निश्चित केली आहे.

कोकणात पावसाळ्यात होणाऱ्या मुसळधार पावसात डोंगराळ भागामुळे कोकणातून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर काळजी घ्यावी लागते. गेल्या काही वर्षांपासून रेल्वे प्रशासनाने कोकण मार्गावर घडणाऱ्या आपत्कालीन घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांचा अवलंब केला आहे. नवनव्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रवाशांचा प्रवास विनाअडथळा सुरळित सुरू आहे. मुसळधार पाऊस झाल्यास रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकांवर विपरीत परिणाम होऊन रेल्वेगाड्या विलंबाने धावतात.


कोकण मार्गावर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आतापासूनच नियोजनाची आखणी सुरू केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने पावसाळ्यात कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेगांवर मर्यादा घालण्याची निश्चितीही केली आहे. दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेगावर मर्यादा घातल्या जातात. रोहा ते ठोकूर दरम्यान रेल्वे गाड्या ताशी १२० ऐवजी ७५ किमीच्या वेगाने धावतात. मुसळधार पावसानंतर गाड्यांचा ताशी वेग ४० किमी होतो.

यंदा १५ जूनपासून पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे

Sanjay Shirsat : संजय शिरसाटांच्या मनात नेमकं चाललंय काय? निवृत्ती की राजकीय खेळी?

शिंदे गटाच्या आमदाराच्या निर्णयामागे कुटुंबातील 'नवे नेतृत्व' आणण्याची खेळी? मुंबई : राज्याचे समाजकल्याण

मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून भांडण! नागपूरचे पोस्टमास्टर जनरलपद नेमके कुणाकडे?

एकीने दुसरीच्या अंगावर पाणी ओतलं, चिमटाही काढला नागपूर : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, प्रशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

सातारा : साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. या

फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, निलंबित PSI बदनेचा शोध सुरू

सातारा : सातारा जिल्हातील फलटण मधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांना २४ तासांच्या आत आरोपी प्रशांत