Rajnath Singh: 'त्यांनी धर्म पाहून मारले, आणि आपण त्यांचे कर्म पाहून मारले...', श्रीनगरमध्ये राजनाथ सिंह यांची गर्जना

श्रीनगर: पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आणि सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी श्रीनगर येथील चिनार कॉर्प्समध्ये भेट दिली. यादरम्यान त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागांत प्रभारी असलेल्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच  सुरक्षा परिस्थितीवर देखील चर्चा करण्यात आली.


यादरम्यान केलेल्या भाषणात ते म्हणाले, "पहलगाममध्ये त्यांनी धर्म विचारून निष्पाप लोकांची  हत्या केली आणि आपण  दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्या कर्मामुळे मारले." त्यानंतर ते पुढे म्हणाले,  "मी संपूर्ण जगाला विचारू इच्छितो की अशा बेजबाबदार आणि दुष्ट राष्ट्राच्या हातात अण्वस्त्रे किती सुरक्षित आहे?" असा सवाल देखील त्यांनी केला.



सैनिकांचे मनोबल वाढवले


राजनाथ सिंह यांनी भारतीय सैनिकांची भेट घेऊन त्यांचे मनोबल देखील वाढवले. ते म्हणाले, "तुम्ही सीमेपलीकडे पाकिस्तानच्या चौक्या आणि बंकर ज्या प्रकारे उद्ध्वस्त केले ते शत्रू कधीच विसरू शकणार नाही. लोकं सहसा उत्साहाच्या भरात आपले भान हरपून काहीही करतात, पण तुम्ही तुमचा उत्साह आणि संयम कायम राखत शत्रूचे लपलेले ठिकाण अचूक नष्ट केले.


२२ एप्रिल रोजी पहलगांम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर १० मे रोजी दोन्ही देशांमधील शस्त्रसंधीनंतर राजनाथ सिंह यांचा हा पहिलाच जम्मू आणि काश्मीर दौरा आहे. त्यामुळे एक संरक्षक मंत्री म्हणून त्यांचा हा दौरा आणि सैनिकांशी संवाद साधणे अत्यंत महत्वाचे होते.




Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या