महाराष्ट्रातील धरणांमध्ये फक्त २८ टक्के पाणीसाठा

मुंबई : उकाड्याने राज्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्याच्या काही भागांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने उपलब्ध जलसाठ्याची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमध्ये २८.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये या कालावधीत २३.४३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. शासनाने दिलेल्या माहितीनुसार, फक्त ८,१६६.१७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.


सर्वाधिक ३८.१३ टक्के पाणीसाठा अमरावती येथील धरणांत आहे.कोकणातील धरणांमध्ये ३४.१५ टक्के, नागपूर येथील धरणांमध्ये ३२.७९ टक्के पाणीसाठा, छत्रपती संभाजीनगरच्या धरणांमध्ये ३१.२३ टक्के, नाशिकच्या धरणांमध्ये ३१.३५ टक्के तर पुण्यातील धरणांमध्ये २१.५२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये १४,२५३.३६ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उरला आहे. त्यापैकी ८,१६६.१७ दशलक्ष घनमीटर एवढाच उपयुक्त पाणीसाठा आहे.


नागपूर येथील धरणांमध्ये ११३५.४ दशलक्ष घनमीटर, अमरावतीच्या धरणांमध्ये ९०१.४१ दशलक्ष घनमीटर, छत्रपती संभाजीनगरच्या धरणांमध्ये १४०३.८२ दशलक्ष घनमीटर, नाशिकच्या धरणांमध्ये ११६९.५६ दशलक्ष घनमीटर, पुण्याच्या धरणांमध्ये २६७८.३२ दशलक्ष घनमीटर, कोकणातील धरणांमध्ये ८७७.६६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.


महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३७७ दशलक्ष लिटर आहे. या धरणांच्या तलावांतून मुंबईला दररोज चार हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. सध्या मुंबईला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या धरणांच्या जलाशयांमध्ये १९.१७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच तारखेला हा साठा १३.६३ टक्के होता.


नाशिक जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये १८ हजार ६२४ दशलक्ष घनफूट अर्थात २८.३६ टक्के जलसाठा आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २५०० दशलक्ष घनफूट अर्थात ४४.४० टक्के जलसाठा आहे. कश्यपीत ६५९ घनफूट अर्थात ३५.५८ टक्के, गौतमी गोदावरीत १६९ घनफूट अर्थात नऊ टक्के, आळंदीत १०३ घनफूट अर्थात १२.६२ टक्के जलसाठा आहे. माणिकपुंज हे धरण कोरडेठाक झाले आहे. इतर आठ धरणांमधील पाणीसाठा अल्प झाला आहे.


महाराष्ट्रातील सर्व मध्यम आकाराच्या धरणांमध्ये ३८.९८ टक्के तर लघू आकाराच्या धरणांमध्ये ३१.५५ टक्के तर महाराष्ट्र राज्य प्रकल्पातील धरणांमध्ये २९.९४ टक्के पाणीसाठा आहे.

Comments
Add Comment

काँग्रेसचे ठरले, वंचित बहुजन आघाडीला सोडणार ६०पेक्षा अधिक जागा?

यंदा महापालिकेत वंचितचे खाते उघडण्याची दाट शक्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी

माहिममध्ये दोन जागांवर बोळवण, मनसे उबाठावर नाराज

माहिम विधानसभा उबाठा आणि मनसेची ठरणार डोकेदुखी कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी सूर उमटवायला सुरुवात

प्रशिक्षणाला अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवण्यावर निवडणूक विभाग ठाम

जे कर्मचारी गैरहजर असतील त्यांची नावे त्वरित कळवण्याचे केले आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी)

‘ए मेरे वतन के लोगो’ आणि रोहित शर्मा; भावूक करणारा व्हिडिओ चर्चेत

मुंबई : रोहित शर्मा केवळ मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही आपलं देशप्रेम वेळोवेळी व्यक्त करताना दिसतो. पुन्हा

मुंबई महापालिका क्षेत्रात १ लाख ६८ हजार दुबार मतदार

मुंबई : मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांच्या छाननीत अखेर एक लाख ६८ हजार ३५०

पुण्यात महाविकास आघाडीत फूट, आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार

पुणे : पुण्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होताच तासाभरात महाविकास आघाडी फूटली आहे. आम आदमी पक्षाने (आप)