Tiranga Yatra in Thane: भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ ठाण्यात भव्य तिरंगा यात्रा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उत्स्फूर्त सहभाग

  50

ठाणे: ऑपरेशन सिंदूरद्वारे (Operation Sindoor) काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी विरुद्ध कारवाई, तसेच भारत पाक संघर्षात पाकड्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्यांच्या कामगिरीचा गौरव करण्या हेतू आज ठाणे शहरात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. ज्याद्वारे भारतीय सैन्याचा पराक्रम जनतेपर्यन्त पोहोचवण्याचा, आणि त्यांच्या सामर्थ्याचे कौतुक करण्यात आले.


या यात्रेदरम्यान "वंदे मातरम", "भारत माता की जय" अशा देशभक्तिपूर्ण घोषणा देण्यात आल्या . यावेळी सर्वांच्याच चेहऱ्यावर देशासाठी अभिमान आणि सैन्याच्या प्रति आदराची भावना झळकत होती. तिरंगा हातात घेऊन ठाणेकर उत्साहाने या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. जवळजवळ साडेतीन तास ही रॅली ठाण्याच्या विविध भागातून मार्गक्रमण करत होती.


या यात्रेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः यात सहभागी झाले होते. त्यांच्या सोबतच मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के आमदार रवींद्र फाटक, राम रेपाळे, हेमंत पवार, द्वारकानाथ भोईर, मनोज शिंदे, एकनाथ भोईर यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते.


या रॅलीची सुरुवात शासकीय विश्रामगृहासमोरून सुरुवात झाली, त्यानंतर ठाणे महानगरपालिका, गोखले रोड, वागळे इस्टेट, इंदिरानगर आणि पाचपाखाडी या मार्गांवरून ही रॅली जनतेचा उत्साह वाढवत पुढे सरकली. या रॅलीचा समारोप ठाणे महानगरपालिका भवनासमोर झाला.
Comments
Add Comment

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर