दादासाहेब फाळकेंच्या बायोपिकच्या निमित्ताने आमिर खान आणि राजकुमार हिरानी एकत्र येणार

मुंबई : भारतीय सिनेमाचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक येणार आहे आणि या ऐतिहासिक प्रकल्पामागे आहेत अभिनेता आमिर खान आणि दिग्गज दिग्दर्शक राजकुमार हिरानी ज्यांनी यापूर्वी ‘3 इडियट्स’ आणि ‘पीके’ सारखे अविस्मरणीय सिनेमे दिले आहेत.

भारत सरकारकडून दिला जाणारा सर्वात प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्यांच्या नावाने आहे, त्या व्यक्तिमत्वाची कथा आजपर्यंत हिंदी सिनेमात साकारण्यात आली नव्हती. मात्र आता ही सिनेमाच्या जन्माची कथा, सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर उलगडली जाणार आहे.हा चित्रपट स्वातंत्र्य संग्रामाच्या पार्श्वभूमीवर घडणारी एका कलाकाराची विलक्षण संघर्षमय कहाणी मांडणार आहे. ज्यांनी शून्यातून सुरुवात करून जगातील सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टीची पायाभरणी केली.

या चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहे. 'सितारे जमीन पर'च्या प्रदर्शनानंतर आमिर खान लवकरच या भूमिकेसाठी तयारी सुरू करणार आहेत. चित्रपटासाठी लॉस एंजलिसमधील व्हीएफएक्स स्टुडिओंनी त्या काळातील युगदर्शक डिझाइन्स आधीच एआयच्या साहाय्याने तयार केली आहेत.

चित्रपटाच्या लेखनावर राजकुमार हिरानी, अभिजात जोशी, हिंदुकुश भारद्वाज आणि अविष्कार भारद्वाज हे चार लेखक गेले चार वर्षे झाले काम करत आहेत. विशेष म्हणजे, दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर श्रीकृष्ण पुसळकर यांनी या प्रकल्पासाठी आपला पूर्ण पाठिंबा दिला असून त्यांनी त्यांच्या आजोबांच्या आयुष्यातील अनेक खास आठवणी आणि प्रसंग शेअर केले आहेत.
Comments
Add Comment

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी

अभिनेत्री करिश्माने मारली चालत्या लोकलमधून उडी

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा शर्मा हिचा मुंबईतील चर्चगेट येथे अत्यंत गंभीर अपघात झाला. करिश्मा स्वतःने

चिंतामणीचे सेवेकरी पांडुरंग मोरेंवर आला म्युझिक व्हिडीओ

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव देशभरातल्या भाविकांसाठी चर्चेचा विषय असतो. हा गणेशोत्सव उत्साहात साजरा

Shahid Kapoorला हा नाश्ता इतका आवडतो की सातही दिवस तो खाऊ शकतो, मीरा राजपूतने केला खुलासा

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत दोघेही त्यांच्या फिटनेसबद्दल आणि डाएटबद्दल खूप