Rohit Sharma Meets Devendra Fadnavis: कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा थेट मुख्यमंत्र्याच्या भेटीला

मुंबई: कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या भेटीचे फोटो देवेंद्र फडणवीस यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहेत.


सोशल मीडियाद्वारे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केल्यानंतर जवळजवळ एका आठवड्यानंतर, रोहितने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल, दिनांक 14 मे रोजी वर्षा बंगल्यावर भेट घेतली.


त्यांच्या भेटीचे फोटो शेअर करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी लिहिले, "माझ्या वर्षा निवासस्थानी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचे स्वागत करणे, भेटणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे खूप छान वाटले. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याबद्दल आणि त्यांच्या प्रवासाच्या पुढील टप्प्यात यश मिळावे यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो!"


 


रोहित शर्माची कसोटी कारकीर्द


गेल्या आठवड्यात रोहित शर्माने त्याच्या कसोटी कारकिर्दीला पूर्णविराम दिला. त्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या रोहितने ६८ कसोटी सामन्यांमध्ये ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्या आहेत. त्याने १२ कसोटी शतके झळकावली असून १८ अर्धशतकांचादेखील यात समावेश आहे.


रोहितची कसोटी कारकीर्द फेब्रुवारी २०१० पासून सुरू झाली.  त्याने कोलकात्यात पदार्पणातच १७७ धावांची शानदार खेळी करत आपल्या आगमनाची घोषणा केली.  सलामीवीर म्हणून त्याच्या पहिल्याच कसोटी मालिकेत, रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये एक द्विशतक आणि दोन शतके झळकावत हे स्थान पक्के केले.


जवळजवळ सहा वर्षे, रोहितने भारतासाठी मधल्या फळीत फलंदाजी केली आणि वेळोवेळी चमकदार कामगिरी करूनही सातत्य राखण्यासाठी संघर्ष केला. ऑक्टोबर २०१९ मध्ये त्याला डावाची सुरुवात करण्यासाठी बढती देण्यात आली ज्यामुळे त्याच्या कसोटी कारकिर्दीत एक वेगळाच बदल झाला.


गेल्या आठवड्यात एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये रोहितने लिहिले की तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे पण एकदिवसीय सामन्यांसाठी उपलब्ध राहील. तसेच गेल्या वर्षी विश्वचषकात भारताचे नेतृत्व केल्यानंतर त्याने त्याच्या टी-२० कारकिर्दीमधूनही निवृत्ती घेतली होती.



आयपीएल स्पर्धेमध्ये दिसणार रोहित शर्मा


रोहित शर्मा यंदाची उर्वरित आयपीएल स्पर्धा (IPL 2025) खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तानच्या तणावामुळे आयपीएलची स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित सामने 17 मे पासून खेळवण्यात येणार आहे.


Comments
Add Comment

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता

आता बँकेसारख्या सुविधा लवकरच! मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५