Rohit Sharma Virat Kohali : भाई भाई! निवृत्तीनंतरही विराट आणि रोहितचा ग्रेड ए+ करार कायम, BCCI सचिवांनी दिली माहिती

मुंबई : भारतीय क्रिकेट संघांचे दोन दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यापूर्वीच या दोघांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे आणि ते फक्त वनडे सामने खेळणार आहेत. अशा परिस्थितीत, त्यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या श्रेणीत बदल होईल का? हा प्रश्न पुढे आला आहे. यावर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी विराट आणि रोहित यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट श्रेणीबाबत मोठी अपडेट दिली आहे.


बीसीसीआयचे सचिव सैकिया म्हणाले की, 'रोहित शर्मा, विराट कोहली यांनी जरी टी-२० आणि कसोटी फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असली तरी ते अजूनही भारतीय क्रिकेटचा भाग आहेत, त्यांना ग्रेड ए+ च्या सर्व सुविधा मिळतील.' यामुळे हे स्पष्ट होते की, दोघांच्या पगारात कोणतीही कपात होणार नाही. दोघांनाही बीसीसीआयकडून प्रति वर्ष सात कोटी रुपये मिळत राहतील.



बीसीसीआयने एप्रिलमध्ये सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची नवी यादी जाहीर केली होती. या यादीत बीसीसीआयने ३४ खेळाडूंचा समावेश केला, ज्यात इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचे कमबॅक झाले. ही करार यादी १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीसाठी असणार आहे.


बीसीसीआय फक्त अशा खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समाविष्ट करते ज्यांनी एका वर्षात किमान ३ कसोटी, ८ एकदिवसीय सामने किंवा १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जर एखादा खेळाडू कसोटी खेळत नसेल पण एकदिवसीय आणि टी-२० खेळत असेल तर त्याला कॉन्ट्रॅक्टचा भाग बनले जाते.

Comments
Add Comment

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण

सिडनी ODI मध्ये ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियाने आधीच २ - ०

ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० संघात मोठे फेरबदल! ग्लेन मॅक्सवेल आणि बेन ड्वार्शुइस अखेरच्या टप्प्यात संघात परतणार

मुंबई: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसह आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अनेक

षटकारांचा राजा उपाधीपासून रोहित सहा पावले दूर

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित

माझ्या विजयात प्रतिका रावलचाही समान हक्क! स्मृती मानधनाच्या एका वाक्याने चाहते खूश

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी रविवार, २३ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध न्यूझीलंड