भारतातील सहाव्या आणि युपीतील पहिल्या सेमीकंडक्टर युनिटला कॅबिनेटची मंजुरी; दोन हजार नोकऱ्या उपलब्ध होणार

लखनऊ : उत्तर प्रदेशातील जेवर येथे भारताच्या सहाव्या आणि उत्तर भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर युनिटच्या स्थापनेस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. India Semiconductor Mission अंतर्गत होणाऱ्या या प्रकल्पात एचसीएल ग्रुप आणि फॉक्सकॉन यांच्यात सुमारे ३,७०६ कोटींचा संयुक्त उपक्रम होणार आहे. यामुळे राज्याला मोठी औद्योगिक संधी मिळणार असून सुमारे २,००० थेट नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


केंद्रीय आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री आश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, हे युनिट उत्तर प्रदेशातील पहिले चिप उत्पादन केंद्र असेल. या प्रकल्पामध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप, ऑटोमोबाईल्स, पीसी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी अत्यावश्यक असलेल्या डिस्प्ले ड्रायव्हर चिप्स तयार केल्या जातील. उत्पादन सुरू होण्याची तारीख २०२७ अशी निश्चित करण्यात आली आहे.



उत्तर प्रदेशच्या यमुना एक्स्प्रेसवे औद्योगिक प्राधिकरण क्षेत्रात, जेवर विमानतळाजवळ हे युनिट स्थापन केले जाईल. एचसीएलचा हार्डवेअर उत्पादनातील अनुभव आणि फॉक्सकॉनची जागतिक दर्जाची इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती क्षमता यांचा मेळ या प्रकल्पाला अधिक भक्कम बनवत आहे.


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ट्विटरवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी नेतृत्त्वाखाली उत्तर प्रदेश सेमीकंडक्टर उत्पादनात अग्रगण्य राज्य म्हणून उदयास येत आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल आहे."


भारताचा सेमीकंडक्टर उत्पादनातील सहभाग वाढवण्यासाठी केंद्र सरकारचे हे आणखी एक धाडसी पाऊल मानले जात असून, यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक उत्पादनात जागतिक नेतृत्वाच्या दिशेने प्रगती करत असल्याचे संकेत मिळत आहेत.

Comments
Add Comment

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१