ICC Ranking : रवींद्र जडेजाने रचला भला मोठा इतिहास! आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर

मुंबई : रवींद्र जडेजाने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आयसीसीने कसोटी अष्टपैलू खेळाडूंची नवीन क्रमवारी नुकतीच जाहीर केली आहे, ज्यामध्ये रवींद्र जडेजा ४०० रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. जडेजाने रचलेला विश्वविक्रम म्हणजे तो आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या श्रेणीत सर्वाधिक दिवसांपर्यंत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू ठरला आहे.



अष्टपैलू रवींद्र जडेजाची बाजी


रवींद्र जडेजाने ९ मार्च २०२२ रोजी वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकून जगातील नंबर वन टेस्ट अष्टपैलू खेळाडू बनला होता. तेव्हापासून ३८ महिने होऊन गेले तरीही रवींद्र जडेजा ११५२ दिवसांपासून सतत पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. २०२२ मध्ये जेव्हा रवींद्र जडेजा जगातील नंबर वन टेस्ट अष्टपैलू खेळाडू बनला होता, तेव्हा त्याला ही कामगिरी करण्याची दुसरी संधी मिळाली होती. कारण त्याआधी, तो ऑगस्ट २०१७ मध्ये एका आठवड्यासाठी नंबर वन या जागेवर आला होता.


ताज्या कसोटी अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखण्यासाठी रवींद्र जडेजाची थेट स्पर्धा बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजसोबत होती, त्याचे ३२७ रेटिंग गुण आहेत. नवीन क्रमवारीत, मेहदी हसनने मार्को जॅन्सनला मागे टाकून क्रमांक २ चे स्थान मिळवले होते. मार्को जॅन्सनने एक स्थान गमावले आहे आणि तो आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे, त्याच्या नावे २९४ रेटिंग गुण आहेत.


तसेच पॅट कमिन्स हा चौथ्या क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. तर बांगलादेशचा शाकिब अल हसन पाचव्या स्थानावर विराजमान आहे. जडेजा वगळता टॉप १० मध्ये दुसरा कोणताही अष्टपैलू खेळाडूचा समावेश नाही. त्याच्यानंतर, अक्षर पटेल कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत १२ व्या क्रमांकावर आहे.

Comments
Add Comment

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला