मुंबईत मनसेचं अनोखं आंदोलन! साकिनाक्यात नाल्यात उतरून खेळले व्हॉलीबॉल; नालेसफाईच्या दाव्यांची उघड केली पोलखोल!

  26

मुंबई : मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात, मोठमोठे दावे केले जातात. पण प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे, हे दाखवण्यासाठी मनसेने आज साकिनाक्यात नाल्यात उतरून एक आगळंवेगळं आंदोलन केलं!


साकिनाका परिसरातील एका नाल्यात इतका कचरा जमा झाला आहे की, मनसेचे कार्यकर्ते चक्क त्या नाल्यात उभं राहून व्हॉलीबॉल खेळले! हा प्रकार पाहणाऱ्यांना धक्का देणारा होता. हे आंदोलन मनसेचे चांदिवली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं.


“महानगरपालिका फक्त मोठ्या नाल्यांची सफाई करते. लहान नाल्यांकडे मात्र दुर्लक्ष होतंय. अधिकारी जबाबदारी झटकत एकमेकांकडे बोट दाखवतायत. त्यामुळे आम्हालाच नाल्यात उतरावं लागलं,” असं भानुशाली यांनी सांगितलं.



ते पुढे म्हणाले, जर लवकरच या नाल्याची योग्य सफाई झाली नाही, तर या नाल्यातील सगळा कचरा उचलून एल वॉर्ड कार्यालयात नेऊन टाकू. दुसरा पर्यायच उरणार नाही, असा इशारा महेंद्र भानुशाली यांनी दिला आहे.


या आंदोलनामुळे नालेसफाईचा गाजावाजा आणि प्रत्यक्ष कामातील गैरकारभार पुन्हा समोर आले आहे. पावसाच्या आधी तरी प्रशासनाला जाग येणार का? की यंदाही मुंबईकरांनी पूर, दुर्गंधी आणि रोगराईला सामोरं जावं लागणार? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता