महाकालचे दर्शन घेऊन परतताना झालेल्या अपघातात ISRO शास्त्रज्ञासह आई-वडिलांचा मृत्यू

  46

बुलढाणा : देवदर्शनासाठी गेलेल्या एका कुटुंबाचा परतीच्या प्रवासात चिरडून मृत्यू झाला. महाकालचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या नांदेडच्या पवार कुटुंबाची कार नादुरुस्त ट्रकवर आदळून तुफान अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत ISROमध्ये नुकतेच रुजू झालेले २६ वर्षीय शास्त्रज्ञ निकेतन पवार आणि त्यांचे आई-वडील जागीच ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा थरकाप उडवणारा प्रकार मंगळवारी पहाटे २ वाजता बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यातील खातखेड फाट्याजवळ घडला.


अपघातात मृत्युमुखी पडलेले देवराव पवार (६०), बबिता पवार (५५) आणि त्यांचा मुलगा निकेतन पवार (२६) हे नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील लोकरवाडीचे रहिवासी होते. निकेतन नुकतेच ISROमध्ये शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले होते. सुट्टीवर घरी आल्यानंतर त्यांनी कुटुंबासोबत उज्जैनमध्ये महाकालचे दर्शन घेतले होते. मात्र परतीच्या वाटेवर या कुटुंबाचे भवितव्य थांबले.


या अपघातात मोनिका पवार, प्रियंका पवार, भूमिका पवार, हितांशी राठोड आणि कारचालक संतोष कदम हे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



चुकीचा ट्रक थांबवला आणि तीन जीव घेतले!


अपघातामागे ट्रकचालकाची गंभीर हलगर्जी जबाबदार असल्याचे उघड झाले आहे. ट्रकचा टायर रिमोल्डिंग पट्टा निघाल्यामुळे ट्रक रस्त्याच्या मध्यभागी थांबवण्यात आला होता. वाहनावर कुठलेही इंडिकेटर चालू नव्हते, चेतावणीही नव्हती. परिणामी भरधाव वेगातील इर्टिगा कार थेट त्या ट्रकवर आदळली आणि पवार कुटुंबीयांचा जीव गेला.


या घटनेनंतर नांदुरा पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात IPC कलम २८१, १०६(१), १२५(अ)(३), ३२४(४), ३२३(५) तसेच मोटार वाहन कायदा १८४, १३४/१७७, १२२/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विलास पाटील करत आहेत.


एक बुद्धिमान तरुण शास्त्रज्ञ, उज्ज्वल भविष्य घेऊन देशाच्या सेवेसाठी सज्ज झालेला, आई-वडिलांसोबत महाकालचे दर्शन घेऊन घरी परतत असताना एका बेफिकीर ट्रकचालकाच्या हलगर्जीपणाने कायमचा काळाच्या पडद्याआड गेला. या अपघाताने केवळ एक कुटुंबच नाही, तर एका संभाव्य वैज्ञानिकाची स्वप्नं, राष्ट्राची शक्ती आणि समाजाचे भविष्य हरपले.

Comments
Add Comment

Pune Metro: गणेश भक्तांसाठी स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट दर तीन मिनिटांला धावणार मेट्रो

पुणे: गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी पुणे शहराच्या मध्य भागांत भाविकांची मोठी गर्दी होते. यामुळे भाविकांना

"हिंदूंच्या सणाला विघ्न नको", नवनीत राणांचा जरांगे पाटलांना सल्ला

अमरावती: हिंदूच्या सणाला विघ्न नको, जरांगे पाटलांनी न्यायालयाच्या आदेशाचं पालन केले पाहिजे,' अशी प्रतिक्रिया

मनोज जरांगे विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल समर्थकांनी युट्यूबरला काळं फासलं, कपडे फाडले

छत्रपती संभाजी नगर: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल समर्थकांनी एका

रत्नागिरी : पोटच्या मुलाकडून आईचा सुरीने गळा कापून खून

रत्नागिरी : पोटच्या मुलानेच आपल्या आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि. २६ ऑगस्ट) पहाटे उघडकीस आली. या

Ganeshostav 2025: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गावात दाखल झाले आहेत. त्यामुळे

पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकांची जय्यत तयारी : प्राणप्रतिष्ठा आणि मिरवणुकांचे वेळापत्रक जाहीर

पुणे : लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी आता फक्त काही तास उरले आहेत. बुधवारी देशभरात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात