Operation Sindoor: विदेश मंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवली, ताफ्यात बुलेटप्रूफ वाहन

मुंबई: ऑपरेशन सिंदूरनंतर विदेश मंत्री एस जयशंकर (Foreign Minister S. Jaishankar) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली असून, त्यांच्या ताफ्यात बुलेटप्रूफ वाहन जोडण्यात आले आहे.


ऑपरेशन सिंदूरमध्ये विदेश मंत्री जयशंकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याआधी आणि नंतरही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सतत बैठका घेत होते. अनेक महत्वाच्या आणि पडद्यामागील गोष्टींमुळे, सध्याची परिस्थिती पाहता एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारतातील अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या जीवाला देखील त्याचा धोका असण्याची शक्यता लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरची धडक करावी केली. त्यांनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला, लष्करी कारवायापर्यंत हा तणाव वाढला. मात्र, सध्या भारत पाकदरम्यानच्या अघोषित युद्धाला आता विराम मिळाला आहे. असे असले तरी, पाकड्या आपल्या कुरापती करणं सोडत नाहीय. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता विदेश मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून. त्याच्या घराबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच त्यांना बुलेटप्रूफ कार देण्यात आली आहे.



बुलेटप्रूफ कारमध्ये काय सुविधा असतील?


विदेश मंत्री जयशंकर यांच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आलेली बुलेटप्रूफ कार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. या कारच्या काचा खूप जाड असतात आणि त्या लॅमिनेटेड केलेल्या असतात. ज्यामुळे कोणत्याही बंदुकीची गोळी त्याला भेदून आत जाऊ शकत नाही. तसेच या कारचा टायर पंक्चर जरी झाला तरी ते ५० किलोमीटरपेक्षा जास्त धावू शकते. प्रत्येक प्रकारचे हल्ले लक्षात घेऊन या कारची डिझाइन केली गेली आहे.

Comments
Add Comment

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस