महाराष्ट्रात ५,१२७ कोटींची थेट परकीय गुंतवणूक; २७,५१० रोजगाराच्या संधी!

  47

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन तसेच ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यात आज महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.


सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उद्योग सचिव डॉ. पी. अन्बळगन आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सचे अध्यक्ष आर. के. नारायणन यांच्यात हा करार स्वाक्षरीत झाला. यावेळी उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, उपसचिव लक्ष्मीकांत ढोके, ब्लॅकस्टोन ॲडहायझर्स प्रा. लि.चे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक तुहिन पारिख, ब्लॅकस्टोन ॲडव्हायझर्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक आलोक जैन, एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्सचे व्यवस्थापकीय संचालक आशीष अग्रवाल आदी उपस्थित होते.


हा सामंजस्य करार राज्यातील प्रमुख औद्योगिक आणि मल्टिमोडल लॉजिस्टिक क्षेत्रांमध्ये आधुनिक लॉजिस्टिक्स आणि इंडस्ट्रियल पार्क्सच्या विकासासाठी होणार आहे.



या सामंजस्य करारानुसार महाराष्ट्रात १० हून अधिक आधुनिक औद्योगिक व लॉजिस्टिक्स पार्क्स उभारले जाणार आहेत. यासाठी ७९४.२ एकर जमिनीचे क्षेत्रफळ आहे. यापैकी १.८५ कोटी चौ. फूट जमिनीवर बांधकाम करण्यात येईल. या सर्व प्रकल्पांमध्ये मिळून एकूण थेट परकीय गुंतवणूक ही ५,१२७ कोटी आहे. या करारामुळे थेट व अप्रत्यक्ष अशी एकूण २७,५१० रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे.


हे लॉजिस्टिक्स पार्क्स नागपूर, भिवंडी, चाकण, खंडवा, सिन्नर, पनवेल यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी विकसित केले जाणार आहेत. हे प्रकल्प पर्यावरणस्नेही, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरयुक्त व रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देणारे असून, महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरण २०२४ शी सुसंगत असेल.


ही परिवर्तनात्मक भागीदारी नागपूर, मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणी जागतिक दर्जाचे, पर्यावरण, सामाजिक आणि शासकीय अनुकूल असे औद्योगिक व लॉजिस्टिक्स हब्स तयार करण्याच्या दिशेने पाऊल टाकणारी असून भारतातील उत्पादन, वेअरहाउसिंग व पुरवठा साखळी उत्कृष्टतेसाठी एक सशक्त पायाभूत रचना निर्माण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Dadar Kabutar Khana Controversy: कबुतर खानाच्या राड्यानंतर देवेंद्र फडणविसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले "लोकांचे आरोग्य..."

मुंबई: मुंबईतील दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरून जैन समाज आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. मुंबई उच्च

हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात मनसेचा यू टर्न

मुंबई : न्यायालयाच्या आदेशामुळे मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. तसेच

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसावर खटला

मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस रेल्वेत गोळीबार आणि हत्या प्रकरणात बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी

Dadar Kabutar Khana : प्रार्थना संपली... आता प्रतिकार! कबुतरखान्यावर जैन समाज संतप्त, पोलिसांसोबत बाचाबाची

मुंबई : मुंबईतील कबूतरखाना परिसर पुन्हा एकदा तणावाच्या वातावरणात सापडला आहे. जैन समाजाने यापूर्वी जाहीर केलेले

मुंबईचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा अखेर नगरविकास खात्याला सादर

प्रभाग रचना जुन्याच पद्धतीने, पण घातली विकास आराखड्याची सांगड मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक

तुकाराम मुंढेंची २३वी बदली दिव्यांग कल्याण विभागात

मुंबई  : राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त तुकाराम