उत्तरा केळकर यांना पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार प्रदान

मुंबई : अकॉर्डियन वादक, संगीत संयोजक आणि संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती जपणारा घरगुती वातावरणात २८ वर्षे साजरा होणारा 'स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार" जेष्ठ गायिका उत्तरा केळकर यांना प्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कविता पौडवाल, नितीन तुळपुळे व पौडवाल कुटुंबियांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. पुरस्काराचे स्वरुप ५१ हजार रोख रुपये आणि सन्मानचिन्ह असे आहे.

ज्या कलाकारांनी अरुण पौडवाल यांच्यासोबत काम केले आहे अशा कलावंतांचा या पुरस्कारासाठी प्राधान्याने विचार केला जातो. जेष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांनी अरुण पौडवाल यांच्यासोबत खूप काम केले आहे. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करताना विशेष आनंद होत असल्याचे अनुराधा पौडवाल म्हणाल्या.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना जेष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर म्हणाल्या, "हा पुरस्कार मी अतिशय जबाबदारीने आणि नम्रतेने स्वीकारते, माझ्यासाठी हा पुरस्कार अत्यंत महत्वाचा आहे. ते अनिल - अरुण या जोडीने संगीत देत होते तेव्हाही व त्यानंतर स्वतंत्र झाल्यावरही मी त्यांच्यासाठी अनेक गाणी गायली आहेत. त्यांच्यासोबत काम करताना समृद्ध करणारा दीर्घ अनुभव मला आला आहे. आपल्या घरात अत्यंत प्रतिभावंत आणि लोकप्रिय गायिका असतानाही त्यांनी माझा एका ड्युएट गाण्यासाठी गायिका म्हणून विचार केला, मात्र निर्मात्यांच्या आग्रहामुळे मला ते गाणे देता येत नाही ही खंत त्यांनी बोलून दाखविली, असं सांगण्यासाठीही फार मोठं मन लागतं. अरुणजी हे अफाट कलागुण असलेले महान संगीतकार होते. आज अनुराधा यांच्याकडून त्यांच्या नावाचा हा पुरस्कार स्वीकारताना अनेक आठवणींना उजाळा मिळाला आहे."

पुरस्कार प्रदान सोहळा मुंबईत अनुराधा पौडवाल यांच्या निवास्थानी झाला. या प्रसंगी उत्तरा केळकर यांनी 'माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साऊली' हे अप्रतिम भक्तिगीत सादर केले. याप्रसंगी 'अशी ही बनवाबनावी' मधील गीतकार सुधीर मोघे लिखित व संगीतकार अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेले व अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर यांनी गायलेलं 'कोणी तरी येणार येणार गं' या गीताच्या आठवणींद्वारे जुन्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन चंद्रशेखर महामुनी यांनी केले.
Comments
Add Comment

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारणार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ‘भिडेवाडा’ रुपेरी पडद्यावर

पुणे : ऐतिहासिक वैभवाने नटलेल्या महाराष्ट्रातील वाड्यांमध्ये ‘भिडेवाडा’ हे नाव विशेष मानाने घेतले जाते. कारण ही

RSS च्या शताब्दीनिमित्त ‘शतक : संघाचे १०० वर्ष’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेच्या शंभर वर्षांच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या ‘शतक : संघाचे १००

अभिनेत्री ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी

नवी दिल्ली : प्रयागराज महाकुंभमधील सर्वात मोठा धार्मिक वाद अखेर टोकाला पोहोचला आहे. ज्योतिषपीठाचे शंकराचार्य

‘तो ती आणि फुजी’ पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुपरहिट

पुणे : शिलादित्य बोरा निर्मित आणि मोहित टकळकर दिग्दर्शित मराठी–जापानी चित्रपट ‘तो ती आणि फुजी’चा २४व्या पुणे

प्रियाकां चोप्राच्या बहिणीने स्वीकारला इस्लाम धर्म ?

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये चमकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या दोन बहि‍णीही मनोरंजनविश्वात चमकत

‘व्ही. शांताराम’ यांचे जीवन मेगा बायोपिकच्या रूपात

भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे