ठाकरे गटाला धक्का! तेजस्वी घोसाळकरांचा राजीनामा, भाजपा प्रवेशाच्या चर्चांना उधाण

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या सुनबाई आणि दिवंगत अभिषेक घोसाळकर यांची पत्नी आणि माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीला वैतागून सर्व पदांचा राजीनामा देत पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. स्थानिक नेतृत्वावरील नाराजी आणि सतत दुर्लक्षित होत असल्याची खंत त्यांनी यावेळी स्पष्ट केली आहे.


विशेष म्हणजे, राजीनाम्यानंतर मातोश्रीवरून त्यांना तातडीने बोलावण्यात आले असून डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी घोसाळकर भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही जोरात सुरू आहेत.


सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या हालचाली सुरू असून, मुंबई बँकेच्या संचालकपदाची ऑफर आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारीची शक्यता असल्याचीही जोरदार चर्चा आहे. अगदी काही महिन्यातच मुंबई महापालिका निवडणूक होणार आहे. १ नंबर वॉर्डमधून त्या नगरसेविका होत्या. तेथूनच भाजपा त्यांना या निवडणुकीत मैदानात उतरवू शकतो. एकंदरीतच महापालिका निवडणुकीत भाजपा उत्तर मुंबईतील दहिसर मतदार संघावर आपली पकड मजबूत करण्याच्या तयारीत आहे.



स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी "वैयक्तिक कारणास्तव" राजीनामा दिला असला तरी, यामागील पार्श्वभूमीला स्थानिक संघटनांवरील नाराजी आणि पक्षात दुर्लक्ष यांचा खोल संबंध आहे.


दहिसरसारख्या ठाकरे गटाच्या गडात ही बंडखोरी होत असताना, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा पक्षासाठी गंभीर इशारा मानला जात आहे.


उत्तर मुंबईत शिवसेना ठाकरे पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेजस्वी घोसाळकर यांनी व्हॉट्सअॅपद्वारे विभागप्रमुखांकडे राजीनामा सादर केला आहे. दरम्यान, शिवसेनेचे वरिष्ठ नेते तेजस्वी घोसाळकर यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.


२०२४च्या सुरुवातीला तेजस्वी घोसाळकर यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे घोसाळकर कुटुंब चर्चेत आले. तेजस्वी घोसाळकर यांचे सासरे विनोद घोसाळकर हे मुंबईतील दहिसर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार राहिले आहेत.


गेल्या महिन्यामध्ये तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी व्हॉट्सअप ग्रुपवर आलेली होती. तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाने व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज शेअर करण्यात आला होता. ‘लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद’, अशा आशयाचा हा मेसेज होता.


दहिसर हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला असताना, हा राजीनामा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. उच्च न्यायालयाने चार महिन्यांत महापालिका निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचवेळी घोसाळकर यांच्या बंडखोरीने उत्तर मुंबईत पक्षाला धक्का बसला आहे.


घोसाळकर कुटुंबाचे ठाकरे कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध असतानाही हा राजीनामा ठाकरे गटाच्या अंतर्गत विसंवादाचे चित्र स्पष्ट करतो. आता पहावं लागेल की तेजस्वी घोसाळकर भाजपात प्रवेश करून दहिसरमधील राजकीय समीकरणे कशी बदलतात.

Comments
Add Comment

धारावी ते घाटकोपरमधील प्रक्रिया केलेले मलजल भांडुप संकुलात

पाणी वहन करण्यासाठी संकुलात ९७० लिटर क्षमतेचा जलबोगद्याची उभारणी मलजल प्रक्रिया केंद्रातील पाणी वहन करणाऱ्या

मुंबईकरांनो, राणीबागे भरणार पुष्पोत्सव, कोणत्या तारखेला ते जाणून घ्या..

मुंबई : शिशिर ऋतूची चाहूल लागली की मुंबईकरांना वेध लागतात ते ‘मुंबई पुष्पोत्सवाचे’. घड्याळाच्या काट्यावर आणि

मुंबईतील कोस्टल रोडवर सहा ठिकाणी बायोटॉयलेटची सुविधा

प्रोमेनाडवर पादचारी भुयारी मार्गात उभारण्यात आली ही सुविधा मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी

Budget 2026 : रेल्वे प्रवाशांना मोठं गिफ्ट! कंटाळवाणा प्रवास विसरा, वंदे भारत सुसाट धावणार; पाहा काय आहे प्लॅन?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प उद्या सादर होणार असून, अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) सलग नवव्यांदा

Budget 2026-27 : रविवारी बजेट; शेअर बाजार सुरू असणार की बंद? जाणून घ्या

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या म्हणजेच रविवार १ फेब्रुवारी रोजी २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर करतील.

Sunetra Pawar : मोठी बातमी : सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या पर्वाची आजपासून सुरुवात होत आहे. अजित पवार यांच्या निधनाने