पद्मश्री पुरस्कार विजेते सुब्बन्ना अय्यपन मृतावस्थेत आढळले

श्रीरंगपट्टन : कर्नाटकमधील प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला आहे. डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांचा मृतदेह श्रीरंगपट्टनच्या साई आश्रमाजवळील कावेरी नदीत आढळला.


अय्यप्पन पत्नीसह म्हैसूरच्या विश्वेश्वरा नगर औद्योगिक क्षेत्रात राहत होते. ते ७ मे पासून बेपत्ता होते. घरच्यांनी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. पोलीस तपास सुरू असताना नदीतून वाहत एक मृतदेह किनाऱ्यालगत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले. ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह बघून पोलिसांनी अय्यप्पन कुटुंबाशी संपर्क साधला. अय्यप्पन कुटुंबातील सदस्यांनी मृतदेह बघून ओळख पटवली. डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली आहेत.


पोलिसांनी पद्मश्री पुरस्कार विजेते सुब्बन्ना अय्यपन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तपास सुरू केला आहे. संशयितांची चौकशी सुरू आहे. डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांनी आत्महत्या केली की त्यांना कोणीतरी पाण्यात ढकलून दिले याचा तपास पोलीस करत आहेत.


डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांनी मत्स्यव्यवसायात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतले होते. राष्ट्रीय स्तरावर अनेक उच्च पदांवर काम केले होते. भारताच्या नीलक्रांतीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याप्रकरणी त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन २०२२ मध्ये गौरव करण्यात आला होता.

Comments
Add Comment

१ नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने १ नोव्हेंबरपासून वस्तू आणि सेवा कर नोंदणी आणखी सोपी करण्यासाठी नवी प्रणाली सुरू

जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’

नवी दिल्ली : विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित नवोन्मेषाच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट आणि

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील