मुंबईतील एक लाख गरजूंना मिळणार मोफत जेवण

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईसारख्या शहरात दररोज हजारो नागरिक उपचाराकरिता येतात. अशा रुग्णालयांतील केवळ रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठीच नव्हे, तर स्थलांतरित मजूर, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे गोरगरीब आणि बालक यांची देखील भूक मिटवण्यासाठी अक्षय चैतन्यच्या वतीने दररोज मोफत जेवण आणि पोषक आहार पुरविले जाते.


मुंबईतील 'अक्षय चैतन्य' या सेवाभावी संस्थेच्या निस्वार्थ प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुंबई पोर्ट अथॉरिटीने भायखळा येथील घोडपदेव येथे ३०,००० चौरस फूट भूखंड मंजूर केला आहे, ज्याठिकाणी भारतातील सर्वांत मोठे आणि सर्वांत अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज असे स्वयंपाकघर विकसित केले जाणार आहे.


या अत्याधुनिक किचनमध्ये दररोज १,००,००० गरजूंना पौष्टिक आहार पुरवण्याची क्षमता असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी मुंबई पोर्ट अथॉरिटीचे मुख्य अग्निशमन अधिकारी इंद्रजित बड्डा, मुंबई पोर्ट अथॉरिटीचे इस्टेट मॅनेजर जी. ए. शिरसाट मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या प्लॅनिंग डिपार्टमेंटचे दिलीप शेडकर टीएलसी लीगलचे मॅनेजींग पार्टनर विपिन जैन, व्हीव्हीएफ ग्रुपचे सीएमडी रुस्तम गोदरेज जोशी, महानगर गॅस लिमिटेडचे उपव्यवस्थापकीय संचालक संजय शेडे आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्सचे अमित नबीरा आदी या उपक्रमाला उपस्थित होते.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या