Shopian Encounter: मोठी बातमी! जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांशी चकमक सुरू

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील शोपियान येथील केलर जंगलात सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईदरम्यान चकमक सुरू (Shopian Encounter) झाल्याचे वृत्त आहे. अहवालानुसार सदर ठिकाणी २ ते ३ दहशतवादी असण्याची शक्यता आहे.


जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात आज मंगळवारी संशयित दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी शोपियानमध्ये जाण्यापूर्वी सुरुवातीला कुलगाम जिल्ह्यात चकमक सुरू झाली.


दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील शुक्रू केलर जंगलात भागात दहशतवादी लपून बसले असल्याच्या माहिती शोध मोहिम पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे, सुरक्षा दलांनी तेथे घेराबंदी आणि शोध मोहीमेला सुरुवात केली.  या दरम्यान दहशतवाद्यांनी सैन्यांवर गोळीबार केल्याने त्यांना प्रत्युत्तर देताना शोध मोहिमेचे रूपांतर चकमकीत झाल्याची माहिती झाल्याची माहिती, अधिकृत वृत्तसंस्था पीटीआयने दिली आहे.


अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोळीबार सुरू आहे, परंतु अद्याप दोन्ही बाजूंनी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, असे देखील पीटीआयने म्हटले आहे.



पहलगाम हल्ल्याच्या दहशतवादयांचा शोध सुरूच


२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेकजण जखमी झाले होते. या संदर्भात जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचे पोस्टरही लावले आहेत. त्यांच्यावर 20 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराने अनेक ठिकाणी शोध मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार, सशस्त्र दलाकडून दक्षिण काश्मीर आणि किस्तवारच्या जंगलात शोध मोहीम राबवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आजची कारवाई सकाळी लवकर सुरू करण्यात आली. शोपियानच्या जंगलात लपलेले संशयित दहशतवादी पहलगाम हत्याकांडात सहभागी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे