India Pakistan: आता आम्ही दहशतवादासोबतचे सर्व नाते तोडले, पंतप्रधान मोदींच्या गर्जनेनंतर घाबरला पाकिस्तान

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पंजाबच्या आदमपूर एअरबेस येथून दहशतवाद्यांच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला थेट शब्दात उत्तर दिले. पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे म्हटले की ऑपरेशन सिंदूर केवळ सध्या स्थगित करण्यात आलेले आहे. याला पूर्णपणे बंद करण्यात आलेले नाही. पंतप्रधान मोदींनी म्हटले होते की पाकिस्तान कोणती भूमिका घेतयं याच्यावर त्यांना मापले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानानंतर संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.



आता आम्ही दहशतवादासोबतचे सर्व नाते तोडले


जिओ टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफने म्हटले की पाकिस्तानने दहशतवादाशी सर्व नाते तोडले आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्‍यांनी आपले म्हणणे मांडले. ते म्हणाले, जगातील इतर देशांनी येथे येऊन तपासावे की येथे दहशतवादी कँप आहे की नाही. आम्ही दहशतवादाशी अनेक वर्षांपूर्वी आपले नाते तोडले आहे.



दहशतवादाच्या ठिकाणांवर प्रहार करणार भारत- पंतप्रधान मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी देशाला संबोधित करताना पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा दिला. ते म्हणाले, कोणत्याही प्रकारचे अण्वस्त्र ब्लॅकमेल देश सहन करणार नाही. न्यूक्लियर धमकीच्या आड दहशतवादी ठिकाणांवर भारत थेट आणि निर्णायक प्रहार करेल. भारताची तीनही दले, आमचे एअऱफोर्स, आमचे लष्कर, आमचे नौदल, संरक्षक दल, भारताचे अर्धसैनिक बल सातत्याने अलर्टवर आहेत.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व