भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान बंद असलेली ३२ विमानतळे सुरू होणार

  57

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या सुचनेनुसार भारतीय हवाई क्षेत्र आता पूर्णपणे उघडण्यात आली आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणावादारम्यान बंद असलेली ३२ विमानताळे उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने असे म्हटले आहे की प्रवाशांच्या लक्ष वेधण्यासाठी १५ मे २०२५ रोजी सकाळी ५. २९ वाजेपर्यंत ३२ विमानतळे नागरी विमानांच्या वाहतुकीसाठी तात्पुरती बंद करण्यात आली होती. पण आता ही विमानतळे तात्काळ नागरी विमानांच्या वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहेत.


या कालावधीमध्ये प्रवाशांना नियमित अपडेटसाठी एअरलाइन्सच्या वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचा आणि एअरलाइन्सशी थेट संपर्क साधून त्यांच्या फ्लाइटची स्थिती जाणून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे केवळ हवाई वाहतूक कमी होण्यास मदत होणार नाही तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनाही फायदा होणार आहे.


७ मे रोजी भारतीय सैनिकांनी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशदवादी अड्ड्यावर हल्ला केला आणि पहलगाम दहशदवादी हल्ल्याचा बदल घेतला ज्यामध्ये २६ निष्पाप लोक मारली गेली होती. यामधील बहुतेक लोक ही पर्यटक होती. भारतीय सैन्यांच्या कारवाईने घाबरलेल्या पाकिस्ताननेही नियंत्रण रेषा आणि सीमेपलीकडील ड्रोन तसेच क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ले केले. हे लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध शनिवारी सकाळपर्यंत लागू राहणार होत. पण नंतरच्या वाढत्या तणावामुळे ते १५ मे पर्यंत वाढवण्यात आले.



भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतरचा हा निर्णय सामान्य विमान वाहतूक क्रियाकलाप पुनर्संचयित करण्याचे संकेत देत आहे. या निर्णयामुळे हवाई वाहतूक कोंडी कमी होईल आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना फायदा होईल. ऑपरेशन सिंदूर' नंतर खबरदारीचा उपाय म्हणून उत्तर आणि पश्चिम भारतामधील अनेक विमानतळं तात्पुरती बंद करण्यात आली होती. २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. माहितीनुसार, खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगर, लेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाळा, जामनगर आणि इतर अनेक विमानतळ बंद करण्यात आली होती. एकट्या इंडिगोने त्यांच्या १६० ते १६५ नियोजित विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. दरम्यान, आता देशातील तात्पुरती बंद करण्यात आलेली ३२ विमानतळांची सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.


विमानसेवा सुरु झालेल्या विमानतळांची यादी




  1. अधमपूर

  2. अंबाला

  3. अमृतसर

  4. अवंतीपूर

  5. भटिंडा

  6. भुज

  7. बिकानेर

  8. चंदीगड

  9. हलवारा

  10. हिंडन

  11. जैसलमेर

  12. जम्मू

  13. जामनगर

  14. जोधपूर

  15. कांडला

  16. कांगडा (गग्गल)

  17. केशोड

  18. किशनगड

  19. कुल्लू मनाली (भुंटर)

  20. लेह

  21. लुधियाना

  22. मुंद्रा

  23. नळ्या

  24. पठाणकोट

  25. पटियाला

  26. पोरबंदर

  27. राजकोट (हिरासर)

  28. सारसावा

  29. शिमला

  30. श्रीनगर

  31. थोइस

  32. उत्तरलाई

Comments
Add Comment

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

मरेपर्यंत अशा लोकांना समाजात मिळत नाही मान, होतो सतत अपमान

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये जीवनातील अनेक पैलूंबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण