Mawra Hocane : अभिनेता हर्षवर्धन राणेच्या निर्णयावर पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन दुखावली

  97

मुंबई: 11 मे (हिं.स.)।भारत-पाकिस्तान देशामध्ये तणावाचं वातावरण आहे. या सर्व परिस्थितीत एकेकाळी बॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेले पाकिस्तानी कलावंत भारताला दोष देऊन पाकिस्तानचं समर्थन करत आहेत. त्यामुळे या कलाकारांचे भारतीय फॅन्स नाराज झाले आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्याने यापुढे पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत काम करणार नाही, अशी शपथ घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानी अभिनेत्री चांगलीच दुखावली आहे.


'सनम तेरी कसम' या सुपरहिट सिनेमाचा हिरो हर्षवर्धन राणेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली. यात त्याने मोठी घोषणा केली आहे. हर्षवर्धन लिहितो की, "सध्या आसपास जी परिस्थिती आहे आणि माझ्या देशाबद्दल ज्या प्रतिक्रिया मी वाचतोय त्यामुळे मी एक निर्णय घेतला आहे. जर सनम तेरी कसम २ मध्ये आधीचे कलाकार पुन्हा असतील तर या सिनेमात मी काम करण्यास नकार देईल." अशा स्पष्ट शब्दांमध्ये हर्षवर्धनने त्याची नाराजी प्रकट केली आहे. हर्षवर्धनची ही प्रतिक्रियेमुळे सनम तेरी कसममधील त्याची सहकलाकार अभिनेत्री मावरा होकेनला चांगलीच दुखावली गेली असं दिसतंय.



मावराने हर्षवर्धनच्या या स्टेटमेंटला PR स्ट्रॅटेजी म्हणत टीका केली आहे. मावरा म्हणते, "या प्रतिक्रियेला दुर्दैवी, दुःखद किंवा हास्यास्पद म्हणता येईल का? मला नाही माहित. ज्या व्यक्तीकडून मी कॉमन सेन्सची अपेक्षा केली होती तो झोपेतून उठून पीआर स्ट्रॅटेजी राबवतोय. आजूबाजूला काय होतंय हे बघा. आम्ही स्फोटांचे आवाज ऐकतोय, भ्याड हल्ल्यामुळे माझ्या देशातील मुलं मारली जात आहेत, निर्दोष माणसांचा मृत्यू झालाय."


अभिनेत्री मावरा पुढे लिहिते की, "आपल्या देशात युद्धासारखी परिस्थिती आहे आणि तुम्ही सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी एक PR स्टेटमेंट घेऊन आला आहात? किती दुःखद गोष्ट आहे. चित्रपटांवर चर्चा करण्याची, एकमेकांची चेष्टा करण्याची, एकमेकांना कमी लेखण्याची ही वेळ नाही. जर तुम्ही ९ वर्षांनंतर आदर न बाळगता माझे नाव वापरून बातम्यांमध्ये येत असाल, तर कदाचित तुम्ही चुकीच्या टीमने वेढलेले आहात. तुम्ही युद्धाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करू नये, त्यामुळे अनेक लोकांचे प्राण गेले. माझा देश सर्वांपेक्षा वर आहे." अशाप्रकारे मावरा होकेनने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'सनम तेरी कसम' सिनेमात हर्षवर्धन आणि मावरा प्रमुख भूमिकेत होते.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

'दशावतार'च्या गूढ पोस्टरने वाढवली उत्सुकता; १२ सप्टेंबरला उलगडणार रहस्य!

मुंबई: झी स्टुडिओज प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित 'दशावतार' या आगामी मराठी चित्रपटाचे

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

बालकलाकार, तांत्रिक पुरस्कारांतही मराठी कलावंतांचा डंका नवी दिल्ली  : चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या

Rani Mukherji Reaction: पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राणी मुखर्जी काय म्हणाली?

३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर राणी मुखर्जीने मिळवला पहिला राष्ट्रीय पुरस्कार Rani Mukherji Reaction on First national Award: राणी

'द केरळ स्टोरी'ला राष्ट्रीय पुरस्कार! केरळचे मुख्यमंत्री संतापले

अदा शर्माच्या 'द केरळ स्टोरी' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन

‘१२वी फेल’ चित्रपटातील भूमिकेसाठी विक्रांत मॅसीला सर्वोत्तम अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेचा सन्मान आणि उत्सव साजरा करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट