मान्सून केरळमध्ये २७ मे पर्यंत पोहोचणार

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेत पावसाला महत्त्व आहे. यामुळे दरवर्षी देशात मान्सूनचे आगमन कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष असते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १३ मेपर्यंत दक्षिण अंदमानचा समुद्र, बंगालच्या उपसागराचा आग्नेय भाग आणि निकोबार बेटांपर्यंत मान्सून पोहोचणार आहे. तिथून वेगाने पुढे वाटचाल करत मान्सून केरळमध्ये २७ मे पर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

साधारण एक जून पर्यंत केरळमध्ये मान्सून पोहोचतो. पण यंदा मान्सून केरळमध्ये २७ मे पर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील पाच वर्षांत दोनवेळा मान्सून १ जूनच्या आधी केरळमध्ये पोहोचला आहे. केरळमध्ये २०२४ मध्ये ३० मे तर २०२२ मध्ये २९ मे रोजी मान्सून पोहोचला होता.

वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपकल्पामध्ये मान्सूनपूर्व काळामध्ये पडणारा पाऊस, इंडोनेशियावरील वरच्या थरातील उष्णकटिबंधीय क्षेत्रीय वारा, ईशान्य हिंदी महासागरावरील खालच्या थरातील उष्णकटिबंधीय क्षेत्रीय वारा, दक्षिण चीन समुद्रावरील थर्मल रेडिएशन, उष्णकटिबंधीय वायव्य प्रशांत महासागरावरील समुद्रसपाटीचा सरासरी दाब हे तपासून भारतात मान्सून कधीपर्यंत पोहोचणार याचा अंदाज हवामान विभाग व्यक्त करतो. यंदाही याच निकषांच्या आधारे हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाची भाकीत वर्तवले आहे. वातावरणात आयत्यावेळी बदल झाला तर या अंदाजात चार ते सात दिवस पुढे - मागे फरक पडण्याची शक्यता असते.

केरळमध्ये मान्सून पोहोचल्यानंतरच महाराष्ट्रात कधी पर्यंत पोहोचणार याचा नेमका अंदाज वर्तवणे सोपो जाते. प्राथमिक अंदाजानुसार मुंबईत १० जून आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात १५ जून पर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टीला समांतर मुंबईकडे येणाऱ्या मान्सूनच्या प्रवाहात किती ताकद आहे याचाही महाराष्ट्रात येणाऱ्या मान्सूनवर परिणाम होऊ शकतो. यामुळे केरळमध्ये मान्सून पोहोचला की महाराष्ट्राबाबतचा नेमका अंदाज वर्तवता येईल, असे हवामान विभागाने सांगितले. मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाडा, विदर्भ येथे १४ मेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने सांगितले. अवकाळी पावसामुळे राज्यातील निवडक जिल्ह्यांचे तापमान कमी होण्यास मदत होण्याचीही शक्यता आहे.
Comments
Add Comment

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात