India Pakistan Tension: पंजाबमधील अनेक शहरांमध्ये पुन्हा ब्लॅकआउट, राजस्थानमधील जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी

नवी दिल्ली: भेकड्या पाकिस्तानने स्वतःहून पुढे येत भारताविरुद्धचा सुरू असलेला संघर्ष थांबवत असल्याचे सांगत पुन्हा एकदा फना काढण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही देशांनी युद्धजन्य परिस्थितीला विराम लागू केल्यानंतर अवघ्या काही तासांतच पकड्यांनी पुन्हा एकदा भारताच्या सीमेलगत असलेल्या शहरांवर हल्ले चढवले. पण भारतीय लष्कराने त्यांचा हा प्रयत्न देखील हाणून पाडला आहे.


पाकिस्तानने पुन्हा केलेल्या हल्ल्यानंतर, पंजाबमधील फिरोजपूर, गुरुदासपूर, मुक्तसर, होशियारपूर, बर्नाला, मोगा, पठाणकोट, फाजिल्का, कपूरथला आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा ब्लॅकआउट लागू करण्यात आला.  राजस्थानमधील पोखरण आणि बारमेर येथे ड्रोन हल्ले करण्यात आले जे हवेतच नष्ट करण्यात आले. यानंतर, सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला. तर बाडमेरमध्ये हाय रेड अलर्ट जारी करण्यात आला.



पोखरण आणि बारमेरमध्ये ड्रोन हल्ले


पाकिस्तानकडून राजस्थानमधील पोखरण आणि बारमेर येथे ड्रोन हल्ले करण्यात आले, जे भारताने हवेतच नष्ट केले. यानंतर, सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आणि बाडमेरमध्ये हाय रेड अलर्ट जारी करण्यात आला. दरम्यान, जोधपूरमधील सर्व बाजारपेठा बंद होत्या.



पंजाबमधील जिल्हयात ब्लॅकआऊट


पंजाबमधील जिल्ह्यांत शनिवार रात्रीचा ब्लॅकआउट पुन्हा एकदा सतर्क राहण्याची घोषणा करून गेला.  भटिंडामध्ये लोकांनी स्वतःहून ब्लॅकआउट लागू केले. अमृतसरमधील श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती ड्रोनची हालचाल सुरू असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.


आदल्या दिवशीही पाकिस्तानने पंजाबमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन डागले होते. पठाणकोट हवाई तळ आणि लष्करी क्षेत्र, जालंधरमधील आदमपूर विमानतळ, बीएसएफ छावणी, हरिके हेड वर्क्स, श्री गोइंदवाल साहिब येथील थर्मल प्लांटवर हल्ला करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न भारताने यशस्वीरित्या हाणून पाडले होते.

Comments
Add Comment

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान