Hina Khan : भारत पाक संघर्षाबद्दल काय म्हणाली हिना खान? ट्रोलर्सनी साधला निशाणा

मुंबई: अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा सामना करत आहे. हिना कायम स्वतःच्या प्रकृतीची अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते. पण आता तिने तिच्या प्रकृतीबद्दल नाही तर, भारत – पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावग्रस्त वातावरणाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे ती नव्याने चर्चेत आली आहे.



काय म्हणाली हिना खान?


भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत चाललेल्या तणावाबद्दल हिना खानने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने म्हंटले आहे की, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याला उत्तर देणं फार गरजेचं होतं. माझा भारतीय सैन्याला पूर्णपणे पाठिंबा आहे. पण हिनाने पुढे असंही म्हटलं की, दोन्ही देशांमधील परिस्थिती आणखी बिघडू नये. हिनाने अल्लाहला प्रार्थना केली की, जे चुकीच्या मार्गावर गेले आहेत त्यांना योग्य मार्ग दाखव. शुक्रवारी हिनाने केलेल्या या पोस्टनंतर तिला प्रचंड ट्रोलींगचा सामना करावा लागत आहे.




ट्रोलर्सला दिले प्रत्युत्तर


ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत हिना म्हणाली, ‘मला नेहमीच सीमेपलीकडून फक्त प्रेम आणि आपुलकीचा अनुभव आला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’पूर्वी आणि नंतर मला माझ्या देशावर प्रेम आहे. अनेकांनी मला दोष दिला, मला शिव्या आणि धमक्या देखील दिल्या…’


‘अनेकांनी मला अनफॉलो करण्याची धमकी दिली आहे. अश्लील कमेंट आणि तिरस्कार व्यक्त करताना दिसत आहेत. माझा आजार, कुटुंबावर, धर्मावर देखील निशाणा साधला आहे. मी माझ्या देशासोबत आहे. कदाचित हाच फरक आहे, जर मी भारतीय नसती तर मी काहीच नसती.’


पुढे हिना असे देखील म्हणाली, ‘तुम्हाला जे काही करायचं आहे करा. मला काहीही फरक पडत नाही आणि त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. मी कोणाला वाईट बोलली नाही किंवा कोणाचा अपमान केला नाही. मी फक्त माझ्या देशाची बाजू घेतली आहे.’ असं देखील अभिनेत्री हिना खान म्हणाली. हिना खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

Comments
Add Comment

‘मुंज्या’ मधली शर्वरी आणि अहान पांडे अ‍ॅक्शन-रोमँटिक चित्रपटात झळकणार

मुंबई : अभिनेत्री शर्वरी वाघ लवकरच यशराज फिल्म्सच्या आगामी अ‍ॅक्शन आणि रोमँटीक चित्रपटात झळकणार आहे, ज्याचे

अरबाज खान झाला बाबा, पत्नी शुरा खानने दिला मुलीला जन्म

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान यांना रविवारी मुलगी झाली. ५८ व्या वर्षी अरबाज

'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाण लवकरच विवाहबंधनात

मुंबई : 'बिग बॉस मराठी सीझन ५'चा विजेता सूरज चव्हाणच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतीच कोकण हार्टेड गर्ल

“जॉली एलएलबी ३” ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई; अर्शद वारसी आणि हुमा कुरेशीसाठी ठरतोय गेमचेंजर

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट प्रेक्षकांकडून भरभरून

रिया चक्रवर्तीला दिलासा: मुंबई उच्च न्यायालयाने पासपोर्ट परत करण्याचे दिले आदेश!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ला अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा पासपोर्ट

झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : मॅनेजरनेच दिले विष, समोर आली धक्कादायक माहिती

सिंगापूर : सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्ग याचा १९ सप्टेंबरला सिंगापूर येथे नॉर्थ इस्ट इंडिया फेस्टिवल दरम्यान बुडून