‘गोराई कांदळवन उद्याना’ची सफर लांबणीवर

नागरिकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार


मुंबई : सिंगापूरच्या धर्तीवर साकारण्यात येणाऱ्या भारतातील पहिल्या ‘गोराई कांदळवन उद्याना’चे लोकार्पण मे महिन्यात करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, उद्यानातील काही कामे शिल्लक असून ही कामे पूर्ण व्हायला काही अवधी लागणार आहे. त्यामुळे गोराईतील कांदळवन सफरीसाफी नागरिकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.


गोराई येथे आठ हेक्टर क्षेत्रावर तर दहिसर येथे ३० हेक्टर क्षेत्रावर कांदळवन उद्यान विकसित करण्यात येत आहे. हे उद्यान गोराई जेट्टीजवळ असून या उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कांदळवन उद्यानात पर्यटकांना सुमारे ७०० मीटर लांबीच्या मार्गावरून सफर घडणार आहे. दरम्यान, उद्यानाचे काम पूर्ण झाले आहे. काही छोटी-मोठी कामे शिल्लक आहेत. या उद्यानाची नेमकी किती कामे शिल्लक आहेत हे १५ मेपर्यंत स्पष्ट होईल. त्यानुसार उद्यानाच्या लोकार्पणाबाबत निर्णय घेण्यात येईल. साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात या उद्याने लोकार्पण करण्याचा प्रयत्न असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.



बोर्डवॉकवरून कांदळवन न्याहाळता येणार : लाकडाचा वापर करून बोर्डवॉक तयार करण्यात आला आहे. या बोर्डवॉकवरून पर्यटकांना कांदळवन न्याहाळता येणार आहे. पर्यटकांसाठी बोर्डवॉकवर विविध ठिकाणी आसन व्यवस्थाही करण्यात आली आहे. एकही झाड न तोडता, निसर्गाची हानी होणार नाही, अशा पद्धतीने कांदळवन उद्यानाची संरचना तयार करण्यात आली आहे. या उद्यानाला भेट देणाऱ्यांना मुंबईतील कांदळवन परिसंस्थेचे महत्त्व, कांदळवनामुळे मानवाला होणारे फायदे समजू शकतील. त्याचबरोबर कांदळवनाच्या संवर्धनाची आवश्यकता आणि संवर्धनासाठी उपाय कोणते? याची माहितीही मिळू शकणार आहे.


७०० मीटर लांबीचा उन्नत मार्ग : सिंगापूर, अबूदाबी, थायलंडच्या धर्तीवर गोराईमध्ये उन्नत मार्ग साकारण्यात आला आहे. हा मार्ग लाकडी असून त्याची लांबी ७०० मीटर आणि रुंदी २.४ मीटर आहे. तसेच या मार्गात जागोजागी विश्रांतीस्थळ आणि माहितीस्थळ आहेत. हा उन्नत मार्ग तयार करताना कोणत्याही वनस्पतीला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली. गोराई कांदळवन उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात असून काही छोटी-मोठी कामे शिल्लक आहेत.

Comments
Add Comment

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Devendra Fadnavis : भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला

Ganpati Special Trains : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी निवडक गणपती स्पेशल

Megablock : मध्य,पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द, काहींच्या मार्गात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी, संकेत व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना

Jumbo Block : पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची