India Pakistan Tension: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताच्या सरकारी अधिकाऱ्याचा मृत्यू

काश्मीर: पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये सरकारी अधिकाऱ्याची मृत्यु झाल्याची माहिती समोर येत आहे. राजौरीमध्ये अति.जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थापा यांचा मृत्यु झाला असल्याचे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी आपण जम्मू-काश्मीर प्रशासन सेवेतील एक समर्पित अधिकारी गमावला असल्याचं सांगत शोक व्यक्त केला आहे.


राजकुमार थापा हे जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त (ADDC) म्हणून कार्यरत होते. तसेच ते काश्मीरचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत देखील सहभागी झाले होते. राजकुमार थापा यांनी जिल्ह्यातील विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.



काय म्हंटले ओमर अब्दुल्ला?


 


जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला ट्विट करत म्हणाले की, "आज पाकिस्तानने राजौरी शहराला लक्ष्य केले. यात केलेल्या गोळीबारात अधिकाऱ्याच्या निवासस्थानावर हल्ला झाला, ज्यामध्ये आमचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त श्री. राजकुमार थप्पा यांचा मृत्यू झाला. या भयानक जीवितहानीबद्दल मला धक्का आणि दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो"



तोफगोळा लागल्यामुळे मृत्यू


10 मे 2025 रोजी, राजौरी जिल्ह्यातील त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात एक तोफगोळा लागल्यामुळे राजकुमार थापा यांचा मृत्यू झाला. या घटनेत त्यांचे दोन कर्मचारीही गंभीर जखमी झाले आहेत.


शुक्रवारी रात्री पाकिस्तानने गुजरात, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि पंजाब या 4 राज्यांमधील 26 शहरांवर ड्रोन हल्ले केले. भारतीय लष्कराने पाकला जशास तसं उत्तर दिलं आहे.

Comments
Add Comment

मध्य प्रदेशात कफ सिरप प्रकरणात ११ मुलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अटक

मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर भोपाळ (वृत्तसंस्था): छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया भागात कफ

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत